साने गुरुजी शिक्षक पतसंस्थेची निवडणुक बिनविरोध

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- साने गुरुजी शिक्षक व शिक्षकेत्तर सेवकांची सहकारी पतसंस्थेची निवडणुक बिनविरोध पार पडल्याची माहीती सुनिल चव्हाण यांनी दिली.
साने गुरुजी शिक्षक व शिक्षकेत्तर सेवकांची सहकारी पतसंस्थेची सन २०२२—२३ ते २०२७—२८ या कालावधीची निवडणुक प्रक्रीया पार पडली.काल उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता.१४ जागांसाठी १४ अर्ज आल्याने निवडणुक बिनविरोध झाल्याचे निवडणुक निर्णय अधिकारी राजु ढोणे यांनी जाहीर केले. रौप्यमहोत्सवी वर्षात वाटचाल करणार्या खाजगी प्राथमिक शाळेतील शिक्षकांची पतसंस्थेची निवडणुक बिनविरोध करण्यासाठी पतसंस्थेचे माजी चेअरमन अप्पाराव इटेकर व संचालक विरभद्र यादवाड यांच्या नेतृत्वाखाली संचालक मंडळ व सभासदांची बैठक झाली.या बैठकीत बिनविरोध निवडणुकीचे सभासदांना आवाहन करण्यात आले.निवडणुकीमुळे पतसंस्थेचा होणारा खर्च टाळण्यासाठी सभासदांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. शिक्षक सेनेचे राज्य सरचिटणीस रमेश चौगुले, पतसंस्थेचे संस्थापक नागनाथ सुरवसे, महेश सरवदे व गुरुनाथ वांगीकर यांचे निवडणुक बिनविरोध होण्यासाठी विशेष सहकार्य लाभले.
नुतन संचालक मंडळ—सर्वसाधारण गट— विनोद आगलावे,मुरलीधर कडलासकर,भिमराया कापसे,सुनील चव्हाण,उल्हास बिराजदार,धनाजी मोरे,भाऊसाहेब मोरे,विरभद्र यादवाड,शिवानंद हिरेमठ.महिला प्रतिनिधी—महादेवी पाटील,फरजाना रचभरे.अनुसुचित जाती—जयंत गायकवाड इतर मागासवर्गीय—सचिन चौधरी भटक्या विमुक्त जाती—अप्पाराव इटेकर
0 Comments