Hot Posts

6/recent/ticker-posts

माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांना मातृशोक

माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांना मातृशोक

                   वालचंदनगर (कटूसत्य वृत्त):- माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या मातोश्री गिरिजाबाई विठोबा भरणे (वय - ८३) यांचे वृद्धापकाळाने आज शुक्रवार ता. 1 रोजी निधन झाले आहे.राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचे गाव इंदापूर तालुक्यातील भरणेवाडी आहे. त्यांच्या आईला गिरिजाबाई उर्फ जिजी या नावाने ओळखले जात होते. त्यांना धार्मिक व सामाजिक कार्याची आवड होती. गेल्या काही दिवसांपासून त्या आजारी होत्या.

                   दत्तात्रय भरणे यांचे वडील विठोबा यांचे गेल्या दीड वर्षांपूर्वी निधन झाले आहे. गिरिजाबाई यांच्या पश्चात रामचंद,आबासाहेब,मधुकर व दत्तात्रय ही चार मुले तर साळुबाई,कुसुम व हिराबाई अशा तीन मुली,सूना नातवंडे असा परिवार आहे.गिरिजाबाई यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले असून दुपारी २ वाजता भरणेवाडी येथील निवासस्थानानजिक त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments