Hot Posts

6/recent/ticker-posts

अदानी कडून देणगी आणि सत्तेसाठी धनशक्तीचा दुरुपयोग हे कशाचे द्योतक आहे ? - कॉ.आडम मास्तर

अदानी कडून देणगी आणि सत्तेसाठी धनशक्तीचा दुरुपयोग हे कशाचे द्योतक आहे ? - कॉ.आडम मास्तर

                   सोलापूर (कटूसत्य वृत्त):-  या देशातील मूठभर लोकांच्या हातात संपत्तीचे एकत्रीकरण होत असताना संपत्तीचे एकत्रीकरण करणाऱ्या पुंजीपतीना अब्जावधी रुपये करात सवलती दिल्या जातात.असे पुंजीपतीतील अदानी यांच्या साठाव्या वाढदिवसाला साठ हजार कोटी रुपयांची देणगी स्वरुपात विविध शैक्षणिक,सामाजिक संघटना, गैर शासकीय संघटना वाटली.यामध्ये भाजप पक्ष जवळजवळ 20 हजार कोटी रुपयांची देणगी अदानी कडून घेतले. तसेच महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी  आमदारांना बंडखोर नजरकैद करून धनशक्तीचा दुरुपयोग करणे हे कशाचे द्योतक आहे ? 

                   असा सवाल मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या सर्वसाधारण सभेत  ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉ.नरसय्या आडम मास्तर यांनी केले.

                   मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची सर्वसाधारण सभा गुरुवार 30 जून रोजी सांयकाळी दत्त नगर येथील पक्षाचे मध्यवर्ती कार्यालय येथे पक्षाचे जिल्हा सचिव अँड.एम.एच.शेख यांच्या नेतृत्वाखाली व पक्षाचे राज्य समिती सदस्य माजी नगरसेविका  कॉ.नसीमा शेख यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. 

                   प्रास्तविकात एम.एच.शेख म्हणाले की, आज आपल्या समोर मोठे आव्हान उभे आहेत.सध्या महाराष्ट्र राज्यात सत्तांतराचे कधी नव्हे असे महानाट्य महाराष्ट्रातील जनता पाहती आहे. तथाकथित सत्तांध राजकीय पक्षाकडून सत्तेसाठी महाराष्ट्र द्रोह कसा होत आहे यावर प्रकाश टाकण्यासाठी ज्येष्ठ राजकीय विश्लेषक व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे  राज्य सचिव डॉ.उदय नारकर यांचे  बुधवार दिनांक 6 जुलै रोजी सांय 5 वाजता शिवछत्रपती रंगभवन येथे व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.तरी तमाम सोलापूरकरांनी या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन केले. यावेळी सिध्दप्पा कलशेट्टी व माजी नगरसेवक व्यंकटेश कोंगारी यांनी सभेला संबोधित केले.

                   यावेळी मंचावर प्रा.अब्राहम कुमार,शेवंता देशमुख,माजी नगरसेविका कामीनी आडम, म.हनिफ सातखेड, रंगप्पा मरेड्डी, कुरमय्या म्हेत्रे, शंकर म्हेत्रे, नासिर माशाळवाले अनिल वासम आदींची उपस्थिती होती. सभेचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन जिल्हा समिती सदस्य कॉ. अनिल वासम यांनी केले.

Reactions

Post a Comment

0 Comments