Hot Posts

6/recent/ticker-posts

एनएचएआयचे प्रकल्प संचालक चिटणीस, अभियंता येमूल यांचा जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केला गौरव

एनएचएआयचे प्रकल्प संचालक चिटणीस, अभियंता येमूल यांचा जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केला गौरव



              सोलापूर, (कटुसत्य वृत्त):- सोलापूर विजापूर या राष्ट्रीय महामार्गाचे काम विक्रमी वेळेत पूर्ण केल्याबद्दल आज जिल्हाधिकारी यांच्या निवासस्थानी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणचे प्रकल्प संचालक सुहास चिटणीस आणि अभियंता महेश येमूल यांचा पुष्पगुच्छ देऊन गौरव केला.

              महामार्गाचे काम विक्रमी वेळेत पूर्ण केल्याबद्दल श्री. चिटणीस यांचा लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्याही हस्ते सन्मान झाला आहे. सोलापूर विजापूर महामार्गाचे काम विक्रमी वेळेत पूर्ण केले त्याच धर्तीवर सुरत चेन्नई या महामार्गाचे काम देखील वेळेत पूर्ण कराल अशी अपेक्षा श्री. शंभरकर यांनी व्यक्त केली. श्री. चिटणीस यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या टिमने सोलापूर विजापूर महामार्गातील 25 किमी रस्ता 17 तासांत पूर्ण केला. याची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली.

              तसेच सुरत चेन्नई या महामार्गाच्या बार्शी तालुक्यातील मोजणीचे काम वेळेत पूर्ण केल्याबद्दल तहसीलदार अंजली मरोड यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी जिल्हा भूमी अभिलेखचे जिल्हा भूमी अधिक्षक हेमंत सानप, उपजिल्हाधिकारी अरूणा गायकवाड, अनिल विपत उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments