सोलापूरात धनगर साहित्य संमेलन; गडकरींच्या हस्ते उद्घाटन तर केजरीवाल समारोपाला येणार
.png)
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- चौथ्या आदिवासी धनगर साहित्य संमेलनाचे येत्या २३ व २४ जुलै रोजी सांगोला तालुक्यात आयोजन करण्यात आल्याची महिती योजनचे संस्थापक डॉ. अभिमन्यू टकले यांनी सोलापुरात पत्रकार परिषदेत दिली.
या संमेलनाचे उद्घाटन २३ जुलै रोजी दुपारी बारा वाजता केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार असून २४ रोजी सायंकाळी पाच वाजता दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या प्रमुख उपस्थितीत या संमेलनाचा समारोप होणार आहे. संमेलनाच्या अध्यक्षपदी सांगलीच्या अहिल्या शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आर. एस. चोपडे यांची तर स्वागताध्यक्षपदी प्रा. संजय शिंगाडे यांची निवड करण्यात आली आहे.
या दोन दिवसीय संमेलनात साहित्य दिंडी, स्व. गणपतराव देशमुख आदर्श आमदार पुरस्काराचे वितरण, विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव, परिसंवाद, चर्चासत्र, व्याख्याने आदी भरगच्च कार्यक्रम होणार आहेत. तसेच धनगर समाज आरक्षण, धनगर समाजातील अधिकाऱ्यांकडून समाजाच्या अपेक्षा, समाजातील महिलांचे व समाजाचे इतर प्रश्न आदी विविध बाबींवर चर्चा व विचारविनिमय होणार असल्याचे डॉ. टकले यांनी सांगितले.
या पत्रकार परिषदेस स्वागताध्यक्ष प्रा. संजय शिंगाडे, संभाजीराव सूळ, चंद्रकांत हजारे, शेखर बंगाळे, गडदे आदी उपस्थित होते.
0 Comments