Hot Posts

6/recent/ticker-posts

शिक्षण, वैद्यकीय आणि रोजगाराचे प्रश्न सोडविणार- बालाजी चौगुले

शिक्षण, वैद्यकीय आणि रोजगाराचे प्रश्न सोडविणार- बालाजी चौगुले

                सोलापूर (कटूसत्य वृत्त):- युवा सेनेच्या माध्यमातून शिक्षण, वैद्यकीय आणि रोजगाराचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही, युवा सेनेचे नूतन जिल्हाप्रमुख बालाजी चौगुले यांनी दिली. युवा सेनेच्यावतीने जिल्हाप्रमुखपदी निवड झाल्याबद्दल पार्क चौकातील युवासेनेच्या कार्यालयासमोर बुधवारी युवासेनेचे मार्गदर्शक विठ्ठल वानकर यांच्या हस्ते चौगुले यांचा सत्कार करण्यात आला. तसेच जल्लोषही करण्यात आला.

                जिल्हाप्रमुख चौगुले म्हणाले, आज राज्यातील सरकारमध्ये जे काही गलिच्छ राजकारण सुरू आहे ते महाराष्ट्रासाठी भूषणावह नाही. परंतु या जरी घडामोडी राज्यात घडत असल्या तरी महाराष्ट्रातील व सोलापुरातील शिवसैनिक हा निष्ठेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सोबतच राहणार आहे. कोणी शिवसेना सोडल्यामुळे पक्षाला काहीही फरक पडत नाही. राहिले आहेत ते मावळे आहेत आणि गेले आहेत ते कावळे आहेत.

                महापालिकेच्या निवडणुकीत महापालिकेवर भगवा फडकवण्यासाठी युवा सेना जोमाने कामाला लागणार असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे आणि जिल्हाप्रमुख गणेश वानकर यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहर आणि जिल्ह्यात युवा सेना मजबूत करण्यावर भर राहणार असल्याचे सांगत सामान्य जनतेच्या अडचणी सोडविण्यासाठी युवा सैनिक रस्त्यावरची लढाई लढण्यासाठी सुद्धा मागेपुढे पाहणार नसल्याचे बालाजी चौगुले त्यांनी सांगितले. यावेळी योगेश भोसले, गुरुनाथ शिंदे, प्रसाद नीळ, अमर बोडा, खंडू सलगरकर, काशिनाथ विभुते, राहुल गंधुरे, मल्लिनाथ कारमपुरी, अर्जुन गायकवाड, विष्णू जगताप, संकेत गोटे, विशाल पवार, संदीप हंचाटे, पांडुरंग माळगे, मनोहर दोंतुल, मनोज शावंतुल, उपेंद्र मेरगु, अक्षय बारामतीकर यांच्यासह युवा सेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

युवा सेनेचे ग्रहण सुटले

                राज्यातील निष्ठावंत सेनेशी एकनिष्ठच राहिले आहेत. गद्दार लोकच गेले आहेत. गद्दारांच्या पाठीमागे महाराष्ट्रातला एकही शिवसैनिक नाही. बाळासाहेबांनी मजबूत अशा पद्धतीने संघटनेची बांधणी केली आहे. जे गेले आहेत ते आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी गद्दार फुटून गेलेले आहेत. त्यांच्या पाठीमागे अद्याप शिवसेना नाही. मध्यंतरीच्या काळामध्ये सोलापूर युवा सेनेला ग्रहण लागले होते. ते ग्रहण आता सुटले असून, युवा सेनेने खऱ्या अर्थाने मोकळा श्वास घेतला आहे. यापुढे युवा सेना जिल्हाप्रमुख चौगुले यांच्या नेतृत्वाखाली अतिशय जोमाने आणि सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी अग्रेसर असेल असे माजी शहर युवा अधिकारी विठ्ठल वानकर यांनी सांगितले.

Reactions

Post a Comment

0 Comments