आ. सुभाष देशमुख यांनी घेतली रेल्वे अधिकार्‍यांची बैठक - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, July 25, 2022

आ. सुभाष देशमुख यांनी घेतली रेल्वे अधिकार्‍यांची बैठक

आ. सुभाष देशमुख यांनी घेतली रेल्वे अधिकार्‍यांची बैठक

शताब्दी, सोलापूर- कोल्हापूर एक्स्प्रेस सुरू करण्यासह विविध विषयांवर चर्चा

                सोलापूर (कटुसत्य वृत्त): आ.सुभाष देशमुख यांनी डीआरएम ऑफिसमध्ये डीआरएम रेल्वे अधिकार्‍यांची बैठक घेतली. यावेळी शताब्दी एक्स्प्रेस, सोलापूर- कोल्हापूर एक्स्प्रेस लवकर सुरू करावी, देगाव जलसेतू हा प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लावावा यासह विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. याबैठकीला डीआरएम शैलेश गुप्ता, गौरव सैनी, इरिगेशन विभागाचे अधीक्षक अभियंता बागडे, कार्यकारी अभियंता कोंडेकर व इतर अधिकारी उपस्थित होते.

                देगाव जलसेतू  प्रकल्प तीन वर्षापासून प्रलंबित  आहे. हा प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लावून पंधरा हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली कसे येईल यासाठी लवकरात लवकर प्रयत्न करावेत, आसरा उड्डाण पुलास 28 कोटी रुपये मंजूर झाले आरहेत, यासंदर्भात  नॅशनल हायवे राज्य महामार्ग व   महापालिकेसोबत बैठक घेत  पुलाचा आराखडा सबमिट करून घेऊन पुढील मंजुरी पाठवावा, शताब्दी एक्सप्रेस आणि सोलापूर कोल्हापूर एक्सप्रेस गाडी लवकरात लवकर सुरू करून प्रवाशांची सोय करावी, पाकणी गाव येथे भुयारी मार्ग करण्यासंदर्भामध्ये तातडीने तेथील सर्वे करून घेऊन तिथला प्रस्ताव राज्य शासनास व रेल्वे विभागाची मीटिंग घेऊन मार्गी  लावावेत, महिला बचत गटांना प्लॅटफॉर्म वर  स्टॉल उपलब्ध करून द्यावा, तसेच हुतात्मा एक्सप्रेस व इंद्रायणी एक्सप्रेस यांना हडपसर येथे थांबा करून देणे यावरती चर्चा करण्यात आली.

सर्व अडचणी सोडवण्यास प्रयत्नशिल

                सर्व मागण्या सोलापूरकरांसाठी आहेत. त्यासाठी लवकरात लवकर प्रयत्न करावेत, जेथे निधी असो अथवा कोणतीही अडचण असो आपल्याला कळवावे, आपण राज्य अथवा केंद्र स्तरावर पाठपुरावा करून अडचणी सोडवू, असे आश्‍वासन आ. सुभाष देशमुख यांनी दिले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages