Hot Posts

6/recent/ticker-posts

हॅप्पी डेज इंटरनेशनल स्कूलमध्ये डॉक्टर्स डे उत्साहात साजरा

हॅप्पी डेज इंटरनेशनल स्कूलमध्ये डॉक्टर्स डे उत्साहात साजरा

              सोलापूर (कटूसत्य वृत्त):- एक जुलै अर्थात राष्ट्रीय डॉक्टर्स डे हॅप्पी डेज इंटरनेशनल स्कूलमध्ये अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी स्कूल ऑफ अलाईड हेल्थ सायन्स पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे समन्वयक डॉ. अभिजित जगताप , पिंडिपॉल नर्सिंग होमचे,‌‌ डॉ. श्रीनिवास पिंडिपोल , पिंडिपॉल नर्सिंग होमचे , डॉ. गीता पिंडिपोल, इंदिरा क्लिनिकचे डॉ. नितीन शंकुर यांनी विद्यार्थींना आणि पालकांना मार्गदर्शन केले. या वेळी डॉ. अभिजित जगताप यांनी कोविड मध्ये डॉक्टरांनी केलेलं योगदान आणि मुलांना उत्तम आरोग्यासाठी पोषण, व्यायाम आणि त्यासाठीचे अंगी करून घ्याचे सवयी या विषयावर शिक्षक कसे विद्यार्थींना मार्गदर्शन करतात हे त्यांनी पालकांना पटवून दिलं. डॉ. श्रीनिवास पिंडिपोल यांनी समाजाला चांगले सवयी हे उत्तम राष्ट्र निर्मितीसाठी बल कसं देतं आणि एक सुजाण नागरिक आपलं परिसर कसा स्वच्छ ठेऊन राष्ट्र स्वच्छ, सुंदर आणि निरोगी करू शकतो या विषयावर त्यांनी विद्यार्थींना आणि पालकांना मार्गदर्शन केले आणि तसेच त्यांनी विद्यार्थींचे आणि पालकांचे मोफत आरोग्य चाचणी देखील केली. यावेळी डॉ. गीता पिंडिपोल यांनी स्कूलचे विद्यार्थींनीना आणि त्यांच्या मातांना उत्तम आरोग्याबाबतीत आणि मासिक पाळी संदर्भाबद्दल मार्गदर्शन केले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक डूजॉन ब्रॉनक्रस्ट यांनी देखील मुलांना आणि पालकांना मार्गदर्शन केले आणि तसेच अतिथीनेचे आणि पालकांचे आभार यावेळी त्यांनी व्यक्त केले. यावेळी कार्यक्रमासाठी पालकांची उपस्थिती ही लक्षणीय होती.

Reactions

Post a Comment

0 Comments