माणगाव तालुका कृषी विभाग व पंचायत समिती माणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी दिन साजरा

बोरघर / माणगाव (कटुसत्य वृत्त): महाराष्ट्र शासन तालुका कृषी विभाग माणगाव व पंचायत समिती माणगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने हरित क्रांतीचे प्रणेते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कै. वसंतरावजी नाईक यांचे जयंती निमित्ताने 1 जुलै रोजी कृषी दिन पंचायत समिती माणगाव येथे साजरा करण्यात आला. यावेळी श्री. बी. व्ही. काप कृषि अधिकारी यांनी वसंतराव नाईक यांच्या कृषी क्षेत्रातील योगदानाबद्दल प्रास्ताविक केले, उपस्थित शेतकऱ्यांना कृषि दिनाचे महत्व व पंचायत समिती अंतर्गत कृषि विभागाचे विविध योजना याबद्दल माहिती दिली.
तसेच श्री आर डी पवार तालुका कृषी अधिकारी माणगाव यांनी दिनांक 25 जून ते 1 जुलै रोजी कृषी संजीवनी मोहिमेअंतर्गत तालुक्यांमध्ये 110 गावांमध्ये व 1667 शेतकऱ्यांना बांधावर जाऊन मार्गदर्शन करण्यात आले तसेच भात लागवड तंत्रज्ञान, खत बचत, पोष्टिक तृणधान्य नाचणी, महिला शेतकरी सबलीकरण, प्रगतशील शेतकरी संवाद, कृषी पूरक व्यवसाय इत्यादी उपक्रम राबविण्यात आल्याचे सांगितले.
माणगाव पंचायत समितीचे गट विकास अधिकारी श्री. वाय. एम. प्रभे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून शेती करण्याबाबत मार्गदर्शन केले, यामध्ये कलिंगड, हळद,आले, स्टोबेरी इत्यादी नवीन पिकांची लागवड करून उत्पादन वाढविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याबाबत प्रतिपादन केले. तसेच कृषी विभाग व पंचायत समिती हे शेतकऱ्यांच्या पूर्णपणे पाठीशी असल्याबाबत आश्वासनही दिले.
तसेच कृषी दिना वेळी तालुक्यातील सन 2021-22 या वर्षातील भात पीक स्पर्धेतील विजेते श्री बापू बक्कम कोशिंबळे (प्रथम), श्री सोमनाथ पास्टे, मुर(दुत्तीय) श्री. श्रीकांत हाटे,नागाव (तृतीय), व तालुक्यांमध्ये नाचणी पिकामध्ये विक्रमी उत्पादन घेणारे श्री.राजू तेलंगे मौंजे कुंभे यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच आत्मा अंतर्गत नवीन नोंदणी करण्यात आलेल्या नवतरुण शेतकरी गट, दहीवली या गटाला नोंदणी प्रमाणपत्र देण्यात सन्मानित करण्यात आले. तसेच तालुक्यातील महिला शेतकरी गट यांना परसबागेतील भाजीपाला लागवड करण्यासाठी भाजीपाला बियाणे किट वाटप करण्यात आले, या नंतर मा.गट विकास अधिकारी श्री. वाय. एम. प्रभे यांच्या हस्ते कृषी दिनानिमित्ताने पंचायत समितीचे आवारामध्ये वृक्ष लागवड करुन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. यावेळी कृषी विस्तार अधिकारी बी. व्ही. काप, अशोक मार्कड विस्तार अधिकारी, श्री. प्रमोद शिंदे तंत्रज्ञान व्यवस्थापक आत्मा, मंडळ कृषी अधिकारी गोरेगाव श्री किरण पडळकर, व कृषी विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.
0 Comments