कुर्डूवाडीत पाई दिंड्यांचे आगमन व पंढरपूरकडे प्रस्थान!

सांप्रदायिक कुटुंबाकडून मोठ्या प्रमाणात अन्नदानाचा उपक्रम.!
कुर्डूवाडी:(कटूसत्य वृत्त):- मराठवाडयातुन पंढरपूरकडे जाणाऱ्या पाई दिंड्यां ह्या मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्राचे प्रवेशद्वार असलेल्या कुर्डूवाडी शहरामध्ये मुक्कामी येत आहेत व सकाळी येथून प्रस्थान करत आहेत.छोट्या-मोठ्या अनेक दिंड्या चे कुर्डुवाडी शहरामध्ये आगमन झालेले असून त्यांच्या सेवेसाठी बरेच समाजसेवी संस्था व अनेक मंडळे यात कार्यरत आहेत त्यांच्या वतीने अन्नदान हा उपक्रम सालाबाद प्रमाणे याही वर्षी राबवला जात आहे.
यामध्ये श्री महर्षी वाल्मिकी मठ संस्थान समदा काशीपूर ते श्री क्षेत्र पंढरपूर पायी दिंडी सोहळा तालुका दर्यापूर जिल्हा अमरावती (विदर्भ)भागवताचार्य श्री.ह.भ.प.रवींद्र महाराज पाटील, खालखोनीकर यांच्या मार्गदर्शनाखाली दिंडीचे आगमन झाले सालाबाद प्रमाणे व परंपरेने सेवाभावी वृत्तीने कार्य करत असलेल्या शंकर अशोक बागल यांच्या कुटुंबाच्या वतीने या पालखीचे स्वागत करून अन्नदानाचा कार्यक्रम घेण्यात आला.त्याचबरोबर सकाळी अल्पोपहाराची सोय करण्यात आली.श्री व सौ बागल यांच्या हस्ते काकड आरती करून हा दिंडी सोहळा मोठ्या आनंदोत्सवात हरिनामाचा गजर करीत पंढरपूरकडे प्रस्थान झाला.
0 Comments