शिवसेना बंडखोर आमदार संतोष बांगर यांच्यावर राजशिष्टाचार विभागाने तात्काळ कायदेशीर कारवाई करावी - महेश तपासे - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, July 16, 2022

शिवसेना बंडखोर आमदार संतोष बांगर यांच्यावर राजशिष्टाचार विभागाने तात्काळ कायदेशीर कारवाई करावी - महेश तपासे

शिवसेना बंडखोर आमदार संतोष बांगर यांच्यावर राजशिष्टाचार विभागाने तात्काळ कायदेशीर कारवाई करावी - महेश तपासे

राजशिष्टाचार विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर यांना लिहिले पत्र...

                  मुंबई (नासिकेत पानसरे):-  शिवसेना बंडखोर आमदार संतोष बांगर यांनी सह्याद्री अतिथीगृहात आपल्या समर्थकांसह शक्तीप्रदर्शन करुन राजशिष्टाचार कायदा मोडला आहे त्यामुळे राजशिष्टाचार विभागाने त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी प्रधान सचिव मनिषा म्हैसकर यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

                  सह्याद्री अतिथीगृहाचा वापर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, राज्यपाल व राज्याने निमंत्रित केलेल्या पाहुण्यांसाठी आणि प्रशासकीय कामासाठी केला जातो मात्र असे असताना आमदार संतोष बांगर यांनी आपल्या समर्थकांसह शक्तीप्रदर्शन केले. 

                  हे शक्तीप्रदर्शन करण्याचे व्यासपीठ नसताना तसा प्रकार जाणुनबुजुन करण्यात आला ही चुकीची घटना आहे. आमदार संतोष बांगर यांनी कायद्याचे उल्लंघन केले असल्याने त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी असेही महेश तपासे यांनी म्हटले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages