'सुंदर माझे कार्यालय' स्पर्धेत वेणेगाव तलाठी कार्यालय तृतीय...! - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, July 11, 2022

'सुंदर माझे कार्यालय' स्पर्धेत वेणेगाव तलाठी कार्यालय तृतीय...!

'सुंदर माझे कार्यालय' स्पर्धेत वेणेगाव तलाठी कार्यालय तृतीय...!

              बेंबळे (कटुसत्य वृत्त): सोलापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने  १५ फेब्रुवारी ते ३० एप्रिल २०२२  या कालावधीमध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये राबवण्यात आलेल्या 'सुंदर माझे कार्यालय' उपक्रमात तलाठी कार्यालय वेणेगाव ता. माढा या कार्यालयाला तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. रविवारी आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपूरातील शासकीय विश्रामगृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वेणेगाव सजाच्या तलाठी प्रीती काळे  यांचा प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाला   जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते,आ.तानाजी सावंत, आ. प्रशांत परिचारक, अप्पर जिल्हाधिकारी संजीव जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार, जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर, प्रांत व तहसील कार्यालयाचे सर्व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. वेणेगाव तलाठी कार्यालयाला तृतीय क्रमांक मिळाल्याबद्दल तलाठी प्रीती काळे यांचे प्रांताधिकारी ज्योती कदम, तहसीलदार राजेश चव्हाण यांनी अभिनंदन केले. कार्यालयातील वातावरण स्वच्छ, सुंदर आणि पोषक असल्यास शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढते. याचा फायदा प्रशासनाला व सामान्य जनतेला होतो. या उद्देशाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने 'सुंदर माझे कार्यालय' या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages