रसाळ बंधू उद्योग व्यवसायत यशाचे शिखर गाठतील - आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांचा विश्वास

जवळा येथे रसाळ क्लॉथचे दिपकआबांच्या हस्ते उद्घाटन
सांगोला (कटूसत्य वृत्त):- जवळा ता. सांगोला येथील रसाळ कुटुंबीय विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. प्रत्येक क्षेत्रात रसाळ कुटुंबीयांनी आपला ठसा उमटविला आहे. उद्योग आणि व्यवसाय क्षेत्रातही रसाळ बंधू आपल्या विनम्र आणि गुणवत्तापूर्ण सेवेने यशाचे शिखर गाठतील. असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांनी व्यक्त केला. शनिवार दि 23 रोजी जवळा ता. सांगोला येथे मनोज विठ्ठल रसाळ यांच्या रसाळ क्लॉथचे दिपकआबांच्या हस्ते उद्घाटन संपन्न झाले. यावेळी आबा बोलत होते.
उद्घाटन प्रसंगी अरुणभाऊ घुले, सुनील आबा साळुंखे, विजयकुमार देशमुख, सरपंच दत्तात्रय बर्वे, उपसरपंच नवाज खलिफा यांसह ग्रामपंचायतचे सर्व सदस्य, साहेबराव दादा पाटील, आयकर विभागाचे मा. उपायुक्त किरण रसाळ, विस्तार अधिकारी मनोज म्हेत्रे तसेच रसाळ कुटुंबातील अशोक रसाळ, सुधाकर रसाळ, दीपक रसाळ, मनोज रसाळ सुप्रसिद्ध नेत्र विशारद डॉ. संजय रसाळ यांच्यासह रसाळ परिवारातील सर्व सदस्य व नातेवाईक उपस्थित होते.
पुढे बोलताना दीपक आबा म्हणाले जवळा येथील रसाळ परिवार प्रशासकीय, खाजगी व्यावसायिक तसेच सर्वच क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत आहे. या माध्यमातून ते आपल्या गावाचा व परिवाराचा नावलौकिक वाढवत आहेत. रसाळ क्लॉथ या दुकानाच्या निमित्ताने कापड व्यवसायात रसाळ परिवाराच्या तिसऱ्या पिढीनेही पदार्पण केले आहे. रसाळ क्लॉथ या दुकानाच्या निमित्ताने रसाळ परिवाराने आपला पिढ्यांन-पिढ्याचा व्यवसाय निरंतर सुरू ठेवत परंपरा तिसऱ्या पिढीतही जपली आहे. या परिवाराने केवळ कापड याच क्षेत्रात नाही तर शिक्षण, वैद्यकीय प्रशासकीय सामाजिक अशा सर्वच क्षेत्रात आपले भरीव योगदान दिले आहे. रसाळ परिवाराची संस्कृती आणि देहबोली पाहता आपल्या गुणवत्तापूर्ण व विनम्र सेवेने ते ग्राहकांची मने जिंकतील आणि कापड व्यवसायातही ते यशस्वी होऊन नवउद्योजकांसमोर नवीन आदर्श निर्माण करतील असा विश्वासही शेवटी दिपकआबांनी व्यक्त केला.
No comments:
Post a Comment