शासकीय आयटीआय येथे पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार व स्वयंरोजगार मेळाव्याचे आयोजन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, July 12, 2022

शासकीय आयटीआय येथे पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार व स्वयंरोजगार मेळाव्याचे आयोजन

शासकीय आयटीआय येथे पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार व स्वयंरोजगार मेळाव्याचे आयोजन

                  सोलापूर, (कटूसत्य वृत्त):- कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभाग, सोलापूर आणि लोकमंगल फाऊंडेशन व वर्कफोर्स सेंटर प्रा.लि. यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार, दिनांक 14 जूलै, 2022 रोजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (Government ITI), विजापूर रोड, सोलापूर येथे पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार व स्वयंरोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे.

                  यासाठी सोलापूर, पुणे या औद्योगिक परिसरातील एकूण 25 पेक्षा जास्त नामांकित उद्योजकांनी सहभाग दर्शविलेला असून एकूण 750 पेक्षा जास्त रिक्तपदे कळविण्यात आलेली आहेत. त्यांच्याकडून

                  बी.फार्म, ही सर्व रिक्तपदे किमान 10 वी, 12 वी, कोणताही पदवीधर, कोणताही आयटीआय, कोणताही डिप्लोमा, इंजिनिअरिंग, जीएनएम, एम.बी.बी.एस., एम. फार्म, एम.बी.ए. इत्यादी अशा विविध पात्रताधारक उमेदवारांसाठी असून, सोलापूर जिल्हयातील जास्तीत जास्त नोकरीइच्छुक उमेदवारांना या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून नोकरीच्या विविध संधी उपलब्ध करुन देण्यात येत आहेत.

                  तसेच नवउद्योजकांकरिता शासनाचे विविध ८ महामंडळे व त्यांची कर्ज योजनांची माहिती, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जिल्हा उद्योग केंद्र, जिल्हा अग्रणी बँक ऑफ इंडिया (LDM), रुरल सेल्फ एम्प्लॉयमेंट ट्रेनिंग इन्स्टिटयुट (RSETI) यांचे मार्गदर्शन सत्र आयोजित केलेले आहे.

                  तरी नोकरीइच्छूक उमेदवारांनी व नवउद्योजकांनी गुरुवार, दि. 14 जुलै, 2022 रोजी रोजगार मेळाव्याच्या ठिकाणी उपस्थित राहून, आपला सहभाग नोंदवावा व या सुवर्णसंधीचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन कौशल्य विकास विभागाचे सहाय्यक आयुक्त सचिन जाधव यांच्याकडून करण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages