रयत क्रांती संघटनेच्या राज्य सोशल मिडिया सेल अध्यक्ष पदी अमर पवार - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, July 6, 2022

रयत क्रांती संघटनेच्या राज्य सोशल मिडिया सेल अध्यक्ष पदी अमर पवार

रयत क्रांती संघटनेच्या राज्य सोशल मिडिया सेल अध्यक्षपदी अमर पवार

               बेंबळे  (कटूसत्य वृत्त):- रयत क्रांती संघटनेच्या व रयत क्रांती पक्षाच्या महाराष्ट्र राज्य सोशल मिडिया सेल अध्यक्ष पदी अमर पवार यांची निवड करण्यात आली असून रयत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी कृषि राज्यमंत्री आ.सदाभाऊ खोत व रयत क्रांती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष सागर खोत यांनी मुंबई येथे राज्यव्यापी विस्तारित कार्यकारणी बैठकीत घोषणा करून ही निवड करण्यात आली. आ.सदाभाऊ खोत व सागर खोत यांच्या उपस्थिती मध्ये मुंबई येथे संघटनेचे व पक्षाचे राज्यव्यापी विस्तारित कार्यकारणी बैठक आयोजित केली होती.
               यावेळी संघटनेच्या व पक्षाच्या बैठकीस  रयत क्रांती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष दिपक पगारे,माजी प्रदेशाध्यक्ष शिवनाथ जाधव, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष भानुदास शिंदे, युवा प्रदेशाध्यक्ष पांडुरंग शिंदे,  महिला प्रदेशाध्यक्षा निताताई खोत, शिक्षक आघाडीचे एन.डी.चौगुले सर,  कार्याध्यक्ष व पक्षाचे प्रवक्ते दिपक भोसले व  सोलापुर जिल्हा समन्वयक प्रा.सुहास पाटील, राज्य प्रवक्ते जितुभाऊ अडेलकर, लालासो पाटील, वाहतुक संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष बंजरंग भोसले,सोलापूर जिल्हाध्यक्ष शशिकांत थोरात, माढा तालुका अध्यक्ष दत्तात्रय गायकवाड, तसेच राज्यातील व अनेक जिल्हातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

               यावेळी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उठवण्याचे आवाहन आ.सदाभाऊ खोत यांनी सर्व पदाधिकारी यांना केले.या निवडीनंतर अमर पवार यांनी आ.सदाभाऊ खोत व सागर खोत यांच्या मार्गदर्शनाखाली संघटना व पक्ष मजबुत करून, छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या कार्यपद्धती प्रमाणे व भारतीय राज्यघटनेस आदर्श मानुन संघटनेत व पक्षात , शेतकरी,शेतमजुर,कामगार,विद्यार्थी व इतर समाज घटकांच्या हक्कासाठी व सन्मानासाठी काम करण्याचे आश्वासन दिले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages