मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार गजानान भेटीला

मुंबई (नासिकेत पानसरे):- राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उत्तर पच्छिमचे शिवसेना खासदार गजानन किर्तीकर यांच्या तब्येतीची विचारपुस करण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी आले असता राजकिय वर्तुळात पुन्हा चर्चेला उधाण आले
उत्तर पच्छिम मूंबईचे खासदार गजानन किर्तीकर यांची प्रकृति अस्वस्थ असल्याने सोशल मिडियाच्या माध्यमातून त्यानी सांगीतले होते व आपण संसदेत देखील जाणार नसल्याचे सांगितले होते त्यांच्या तब्येतिची विचारपूस करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दुपारी आले असता सुमारे 100 पोलिसांचा फौज फाटा तेथे होता
काही दिवसापूर्वी शिंदे गटाने राज्यात सत्ता स्थापन करित उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का दिला असल्याने दोन दिवसापूर्वी 12 खासदारानी एकनाथ शिंदे याना आपले समर्थन देत लोकसभा अध्यक्षाना पत्र देखील दिले होते याच पार्श्वभूमीवर ही भेट असल्याचे बोलले जात असुन येत्या काही दिवसात खासदार गजानान किर्तीकर हे शिंदे गटात दिसतील ? अशा चर्चा होवू लागल्या आहेत
सुनिल प्रभु - याबाबत सुनिल प्रभु याना विचारले असता गजानन किर्तीकर हे जसे आमचे नेते आहेत तसेच ते त्यांचे देखील नेते होते त्यामुळे त्यांच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी मुख्यमंत्री आले त्यात वावग असे काहिच नाही
No comments:
Post a Comment