माहिती, ज्ञान आणि विविध संशोधनात्मक प्रकल्पांचे आदान-प्रदान महत्वाचे - राज्यपाल श्री. भगत सिंह कोश्यारी यांचे प्रतिपादन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, July 14, 2022

माहिती, ज्ञान आणि विविध संशोधनात्मक प्रकल्पांचे आदान-प्रदान महत्वाचे - राज्यपाल श्री. भगत सिंह कोश्यारी यांचे प्रतिपादन

राज्यपाल यांच्या हस्ते आरोग्य कोशाचेे प्रकाशन व आरोग्य विद्यापीठाचा नॉट्रे डॅम युनिर्व्हसिटी, मायक्रोसॉफ्ट व एन.आय.डी. समवेत सामंजस्य करार समारंभ संपन्न



माहिती, ज्ञान आणि विविध संशोधनात्मक प्रकल्पांचे आदान-प्रदान महत्वाचे - राज्यपाल श्री. भगत सिंह कोश्यारी यांचे प्रतिपादन

                मुंबई (कटुसत्य वृत्त):-  सर्वच क्षेत्रातील माहिती आणि विविध संशोधनात्मक प्रकल्पांचे आदान-प्रदान होणे महत्वाचे ठरणारे असून ज्ञानाच्या सिमा यामुळे विस्तारणार असल्याचे  प्रतिपादन विद्यापीठाचे मा. कुलपती तथा राज्यपाल श्री. भगत सिंह कोश्यारी यांनी केले.

                आधुनिक महाराष्ट्राची जडण-घडण शिल्पकार चरित्रकोशातील ’आरोग्य कोशाचे’ प्रकाशन व वेस्टर्न ऑस्ट्रेलियाच्या नॉट्रे डॅम युनिर्व्हसिटी, मायक्रोसॉफ्ट, नॅशनल इन्स्टिटयुट ऑफ डिझाईन यांच्या समवेत महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा सामंजस्य कराराचे आदान-प्रदान मा. कुलपती यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास अध्यक्षस्थानी मा. राज्यपाल श्री. भगतसिंह कोश्यारी यांच्या समवेत व्यासपीठावर वेस्टर्न ऑस्ट्रेलियाचे आंतरराष्ट्रीय शिक्षणमंत्री डेव्हिड टेम्पलमन, युनिर्व्हसिटी ऑफ नोट्रे डेम ऑस्ट्रेलियाच्या प्रति-कुलगुरु प्राध्यापिका सेलमा अलेक्स, कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) प.वि.से.प., अ.वि.से.प., वि.से.प., प्रति-कुलगुरु डॉ. मिलिंद निकुंभ आदी मान्यवर उपस्थित होते.

                अध्यक्षीय स्थानावरुन बोलतांना विद्यापीठाचे मा. कुलपती तथा राज्यपाल श्री. भगत सिंह कोश्यारी यांनी सांगितले की, माहिती व संशोधन क्षेत्रात भरारी घेण्यासाठी विविध आंतररराष्ट्रीय विद्यापीठासमवेत करण्यात आलेला विद्यापीठाचा सामंजस्य करार महत्वपूर्ण आहे. विविध कार्यशाळा आणि परिसंवादाच्या माध्यमातून माहितीचे आदान-प्रदान करणे शक्य आहे. विविध विद्याशाखांचा पध्दतीने उचाराकरीता उपयोग करणे शक्य असल्यास त्याचा मोठा लाभ समाजाला होईल. विद्यापीठांनी शिक्षण क्षेत्रात तंत्रज्ञान व वैज्ञानिक बाबींचा विचार करुन कार्य करावे. समाजात विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत आंतराष्ट्रीय स्तरावर वाटचाल करण्यासाठी महत्वपूर्ण आहे असे त्यांनी सांगितले.

                ते पुढे म्हणाले की, शिल्पकार चरित्रकोशातील आरोग्य कोश हा महत्वपूर्ण ग्रंथ असून त्याचा आरोग्य व वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थ्यांना व अभ्यासकांबरोबरच सर्वसामान्य लोकांनाही माहितीसाठी नक्कीच उपयोग होणार असल्याचे त्यांनी सांगितले.  

                विद्यापीठाच्या कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) यांनी मनोगतात सांगितले की, पंतप्रधान यांच्या संकल्पनेतील डिजिटल हेल्थ इंडियानुसार विद्यापीठाचे अनेक प्रकल्प कार्यान्वीत करण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीत तंत्रज्ञानाचा वापर मोठया प्रमाणात होत आहे. याचा उपयोग आरोग्य क्षेत्रातील विद्यार्थ्यांना व्हावा यासाठी विविध आंतरराष्ट्रीय नामांकित विद्यापीठांसमवेत सामंजस्य करार करण्यात आला आहे याव्दारा विविध अभ्यासक्रम व संशोधन प्रकल्पांना चालना देण्यात येणार आहे. भविष्यात डिजिटल ग्रंथालय व ई-लर्निंग विषयक प्रकल्प करण्यात येणार आहेत. याकरीता तंत्रज्ञानसंबंधी माहितीसाठी मायक्रोसॉफ्ट या नामांकित संस्थेसमवेत सामंजस्य करार करण्यात आला आहेे.

                त्या पुढे म्हणाल्या की, विद्यापीठ आवारातील वैद्यकीय इतिहास संग्रहालयाचे नॅशनल डिझाईन संस्थान यांच्याकडून नुतनीकरण करण्यात येणार आहे. आरोग्य व शिक्षणाविषयी माहितीचे तंत्रज्ञानावर आधारित सर्व विद्याशाखांचा समवेश असलेले देशातील अनोखे संग्रहालय विद्यापीठ मुख्यालयात होणार आहे. शिल्पकार चरित्रकोशाच्या माध्यमाातून चरित्रनायकांची माहिती उपयुक्त ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.

                या प्रसंगी वेस्टर्न ऑस्ट्रेलियाचे आंतरराष्ट्रीय शिक्षणमंत्री डेव्हिड टेम्पलमन यांनी सांगितले की, तंत्रज्ञानासंबंधी सामंजस्य कराराच्या माध्यमातून शिक्षण व संशोधनाकरीता विद्यापीठाच्या अभ्यासक्रमांचा उपयोग होणार आहे. शिक्षण क्षेत्रात जागतीक स्तरावर मोठया संधी असून तंत्रज्ञानाच्या मदतीने ते शक्य आहे. याकरीता कमी भांडवल व आर्थिक बचत  मोठया प्रमाणात होते. युवा पिढीने तंत्राज्ञान व डिजिटल पध्दतींचा वापर करावा. भविष्यात डिजिटल इकोनॉमीमुळे जगभरात अर्थिकस्थिती सुधारेल याकरीता विविध तज्ज्ञांनी एकत्रितरित्या कार्यशाळा व सामंजस्य कराराच्या माध्यमातून माहितीचे आदान प्रदान करावे. आरोग्य क्षेत्रात तंत्रज्ञानाच्या वापराचा सकारात्मक उपयोग समाजाच्या विकास कार्यासाठी करण्यात यावा असे त्यांनी सांगितले.

                आधुनिक महाराष्ट्राची जडण-घडण शिल्पकार चरित्रकोशाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. महेश पोहनेरकर यांनी आरोग्य कोशाबद्दल माहिती देतांना सांगितले की, आरोग्य कोशात आरोग्य क्षेत्रातील आलोपथी आयुर्वेद, होमिओपॅथी व तत्सम विद्याशाखेत उल्लेखनीय कार्य केलेल्या चरित्रनायकांची माहिती देण्यात आली आहे. विद्यार्थी, शिक्षक व अभ्यागतांकरीता आरोग्य कोश उपयुक्त आहे असे त्यांनी सांगितले.

                विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण यांनी सांगितले की, या करारांमुळे विद्यापीठाने आंतरराष्ट्रीय क्षेत्रात झेप घेतली आहे. शिल्पकार चरित्रकोशाचे मराठी ग्रंथ संपदेत महत्वपूर्ण कार्य असून आरोग्य कोशासाठी माहिती संकलनाकरीता व ग्रंथनिर्मिती करण्यासाठी प्रकाशकांचे कार्य उल्लेखनीय असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचा प्रारंभ मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आला.      

                या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील तोरणे यांनी केले. सामंजस्य या कार्यक्रमास सहसंचालक डॉ. अजय चंदनवाले, विशेष कार्य अधिकारी श्री. नाथानी, डॉ. अजित गोपछडे, डॉ. धनाजी बागल, डॉ. श्रीकांत देशमुख, डॉ. राजश्री नाईक यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, विद्यापीठ प्राधिकरण सदस्य, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages