पंढरपुरात 65 एकर शेजारील 35 एकर जागेत रेल्वेचे दुसरे स्टेशन निर्माण करा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, July 12, 2022

पंढरपुरात 65 एकर शेजारील 35 एकर जागेत रेल्वेचे दुसरे स्टेशन निर्माण करा

पंढरपुरात 65 एकर शेजारील 35 एकर जागेत रेल्वेचे दुसरे स्टेशन निर्माण करा

दत्तात्रय बडवे-शिंदे यांची थेट पंतप्रधान मोदी यांच्याकडे मागणी

कुर्डूवाडीहून येणारी रेल्वे चंद्रभागा नगर येथे थांबवा

                  पंढरपूर (कटुसत्य वृत्त):- रेल्वेची 35 एकर नगरपालिकेने घेण्यापेक्षा पहिल्यांदा 65 एकरात कॉंक्रीटीकरण करा. मगच इतर गोष्टीचा विचार करावा. पंढरपूर येथील चंद्रभागा नदीपलिकडील 65 एकरालगत रेल्वेची जागा आहे. ती आपण पंढरपूर नगरपालिकेला देणार असल्याचे समजले. परंतू 65 एकरामुळे नवीन पंढरपूर निर्माण झालेले आहे. ते असे की 65 एकरात आषाढी वारीत 480, कार्तिकी वारीत 350, माघी वारीत 150 व चैत्री वारीला 50 अशा प्रकारे भारत व महाराष्ट्रातील दिंड्या वरील ठिकाणी सप्तमी ते पौर्णिमा असे आठ दिवस वास्तव्य करतात, अशी माहिती आषाढी यात्रा 2022 चे डेप्युटी इन्स्टिडंट कंमाडर तथा नायब तहसिलदार श्री.किशोर बडवे यांनी दिली. याशिवाय नवीन पुल ते शेगाव दुमाला या ठिकाणी इस्कॉन (हरेकृष्ण मंदिर) व अनेक मोठमोठे 50 मठ झालेले आहेत. पुढे नवा पुल ते सोलापूर रस्ता 10 किलोमीटरपर्यंत 70 मठ निर्माण झालेले आहेत. त्याचप्रमाणे अहिल्या चौक ते गुरसाळेपर्यंत उंच विठोबाचा मठ व गीता मंदिर असे 30 मठ तसेच नवीन पुल ते सोलापूरकडे जाणारा तिऱ्हे मार्ग चौक ते भटुंबरे, आढीव 40 मठ आहेत. त्याचप्रमाणे अहिल्या चौक ते नवीन सोलापूर रोड ते सरगम चौक या भागात औद्योगिक वसाहत व अनेक मठ आहेत. आषाढी व कार्तिकी यात्रा कालावधीत श्री विठ्ठल सुत गिरणीच्या जागेवर सोलापूर रोडवरील विसाव्याजवळ  भाविकांसाठी तात्पुरते बसस्थानक उभारले जाते. जसा याचा उपयोग होतो तसा नवीन रेल्वे स्थानकाचा उपयोग होईल. अशा सर्व नागरिक, भाविकांची सोय होण्यासाठी 65 एकराजवळील रेल्वेच्या मालकीच्या 35 एकर जागेत मुंबईच्या धर्तीवर नदी पुर्व चंद्रभागा नगर नवीन रेल्वे स्टेशन निर्माण करा. कारण सध्या रेल्वे स्टेशन अपुरे पडत असून वरील नमूद भागातील नागरिक व भाविकांना रेल्वे स्टेशन लांब पडत आहे व त्यांचा वाहतूक, सामान खर्च व यात्रेत त्यांना दुप्पट पैसे देवूनही त्यांना सहन करावा लागतो. तरी चंद्रभागा रेल्वे स्टेशनवर उरतल्यावर भाविकांना हरिनाम सप्ताह, आषाढी, कार्तिकी, माघी, चैत्री इत्यादी वारीत चांगली सोय होणार आहे. तरी वरील मागणीचा विचार करावा अशी आग्रही मागणी देशाचे पंतप्रधान मा.ना.नरेंद्रजी मोदी साहेब यांच्याकडे सोलापूर जिल्हा कॉंग्रेस कमिटी ब्राह्मण सेलचे अध्यक्ष दत्तात्रय बडवे-शिंदे यांनी केलेली आहे.

                  या निवेदनाच्या प्रती भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष मा.जे.पी.नड्डा, मा.रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव सोा, भारत सरकार  व रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे साहेब, पंढरपूर - मंगळवेढा विधानसभा आ.समाधान आवताडे, सोलापूर विधानपरिषद माजी आमदार प्रशांत परिचारक व मा.नगरसेविका तथा श्री वि.रू.मं.स. सदस्य शकुंतला नडगिरे यांच्याकडे केलेली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages