मायभूमीतून दोन चाकीवर भारत भ्रमण करणारा 59 वर्षाचा प्रवाशी योद्धा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, July 6, 2022

मायभूमीतून दोन चाकीवर भारत भ्रमण करणारा 59 वर्षाचा प्रवाशी योद्धा

मायभूमीतून दोन चाकीवर भारत भ्रमण करणारा 59 वर्षाचा प्रवाशी योद्धा

             अकलूज (कटूसत्य वृत्त):- लहान वयातच प्रवासाची आवड आणि निसर्गाच्या सान्निध्यात मनसोक्त संचारनारे माळशिरस तालुक्यातील बागेचीवाडी या गावचे मोतीराम तुकाराम वाघ यांनी 1मे ते 31मे 2022 या कालावधीत 16 राज्याचा प्रवास, वयाच्या 58 व्या वर्षी दोन चाकी वाहनावर पूर्ण केल्यामुळे, माळशिरस तालुक्यातून त्यांचे अभिनंदन होत असून अनेक जण त्यांचेकडे प्रवाशी योद्धा म्हणून कौतुकाने पाहत आहेत.

             अकलूज येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत माहिती देताना मोतीराम तुकाराम वाघ म्हणाले की मला लहापणापासूनच प्रवासाची खूप आवड आहे.1990 साली मी 95 दिवसात सायकल वरून भारत भ्रमण केले होते.08/11/2019 ते 20/11/2019 या कालावधीत  बुलेट या दोन चाकी वाहाणावरून  दक्षिण भारताचे दर्शन घेतले.9 फेब्रवारी 2021 रोजी गुजरात,राजस्थान, वाघा बॉर्डर, पंजाब,हरियाणा, चंदीगड, दिल्ली,उत्तर प्रदेश,हरिद्वार असा दोन चाकी वाहनानेच प्रवास पूर्ण केला होता.तर 21 मे 2022 ते 31 मे 2022 या दरम्यान 16 राज्याचा प्रवास दोन चाकीवर पूर्ण करून आपली आवड जपली असल्याची माहिती त्यांनी दिली.

             शेतकरी आणि श्रद्धाळू असणारे मोतीराम वाघ यांचा उदरनिर्वाह शेतीवर आधारित आहे.सुखी संसाराचा रथ चालवीत असताना अशा प्रकारे प्रवासाचा छंद जोपासत राहिले.वेळ प्रसंगी पत्नी नको हा छंद असे म्हणत असतानाही, मोतीराम वाघ यांनी पत्नीच्या विरोधात जाऊन मनसोक्त प्रवासाचा आनंद घेत होते.या वेगवेगळे प्रवासात ते चारशे ते पाचशे किलो मीटरचे रोजचे अंतर पार करीत होते.कधी उंच,उंच अशा डोंगर दऱ्यायावरून तर कधी घनदाट अरण्यातून तर कधी भयाण अशा वाळवंटाचा सामना करीत मोठ्या उत्साहात ते  प्रवास करत होते.तर धडकी भरवणारे रस्ते अपघात हे मोतीराम वाघ यांचे मनोबल ढासळण्याला आव्हान देत असले तरी आवड,छंद,आणि निसर्गाची त्यांना मिळणारी साथ प्रोत्साहन देत होते. म्हणुनच ते सुखरूपपने माय भूमीत परतत असे.त्यांच्या या प्रवासाच्या जिद्दीला आणि धाडसाला अनेक जण सलाम करतात तर कोणी त्यांचा सत्कार करून त्यांचे कौतुक करतात.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages