अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती योजनेसाठी विद्यार्थ्यांनी 25 जुलैपर्यंत अर्ज करावेत

सोलापूर, (नासिकेत पानसरे):- साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.) मार्फत सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षात इयत्ता १० वी, १२ वी, पदवी, पदव्युत्तर, वैद्यकीय व अभियांत्रिकी अभ्यासक्रमामध्ये विशेष प्राविण्याने ६०% पेक्षा जास्त गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या मांग, मातंग, मिनी-मादीग, मादींग, दानखणी मांग,मांग महाशी, मदारी, राधेमांग, मांग गारुडी,मांग गोराडी, मादगी व मादिगा या जातीतील विदयार्थी/विदयार्थीना महामंडळाकडून जेष्ठता व गुण क्रमांकानुसार जिल्हयातील प्रथम ०३ ते ०५ विदयार्थ्यांना निधीच्या उपलब्धतेनुसार प्रोत्साहनपर अण्णा भाऊ साठे शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे.
तरी इच्छुक मांग, मातंग, मिनी-मादीग, मादींग, दानखणी मांग, मांग महाशी, मदारी, राधेमांग, मांग गारुडी, मांग गोराडी,मादगी व मादिगा या जातीतील विदयार्थ्यांनी/विदयार्थीनी दि.२५ जुलै २०२२ पर्यंत महामंडळाचे जिल्हा कार्यालय, डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, सात रस्ता, शासकीय विश्रामगृहाच्या पाठीमागे, बीग बजार समोर, सोलापूर येथे प्रत्यक्ष अथवा पोष्टाव्दारे अर्ज सादर करावे. दिलेल्या मुदतीनतंर प्राप्त अर्ज स्विकारले जाणार नाहीत याची नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मुंबई अंतर्गत जिल्हा कार्यालय सोलापूर यांनी केले आहे.
सोबत खालीलप्रमाणे कागदपत्रे सादर करावीत :-
- अण्णा भाऊ साठे शिष्यवृत्ती मिळण्यासाठी अर्ज
- सन 2021-22 या शैक्षणिक वर्षात उत्तीर्ण झाल्याची मार्कलिस्ट
- शाळा सोडल्याचा दाखला
- जातीचा दाखला
- पुढील वर्षात प्रवेश घेतल्याची पावती
- रेशनकार्ड
- आधारकार्ड
No comments:
Post a Comment