लोकनेते कारखान्याचा 150 रुपये प्रमाणे दुसरा हप्ता शेतकर्यांच्या खात्यावर जमा... - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, July 18, 2022

लोकनेते कारखान्याचा 150 रुपये प्रमाणे दुसरा हप्ता शेतकर्यांच्या खात्यावर जमा...

लोकनेते कारखान्याचा 150 रुपये प्रमाणे दुसरा हप्ता शेतकर्यांच्या खात्यावर जमा...

               घोड़ेश्वर (कटुसत्य वृत्त):- लोकनेते बाबुराव पाटील साखर कारखाना,अनगर गळीत हंगाम 2021–2022  मध्ये गाळपास आलेल्या ऊसाचा दुसरा हप्ता 150 रुपये प्रमाणे दि.18 जुलै रोजी शेतकऱ्यांच्या डी.सी सी बॅक खातेवर जमा करण्यात आल्याची माहिती लोकनेते शुगर चे चेअरमन विक्रांत (बाळराजे) राजन पाटील यांनी दिली.

               आपल्या लोकनेते बाबुराव पाटील साखर कारखान्याने गळीत हंगाम 2021–2022 साठी गाळपास आलेल्या ऊसास पहिली उचल 1800 प्रमाणे दिलेली असुन आता दूसरा हप्ता 150 रू. प्रमाणे काढलेला असुन तो शेतकऱ्यांच्या डी.सी सी बॅक खातेवर जमा करण्यात आला असल्याचे लोकनेते शुगरचे चेअरमन विक्रांत (बाळराजे) राजन पाटील यांनी दिली.

               यावेळी संचालक अजिंक्यराणा पाटील, प्रकाश चवरे, मदन पाटील, अशोक चव्हाण, संभाजी चव्हाण, शुक्राचार्य हावळे, संदीप पवार उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages