रोटरी क्लब ऑफ सोलापूरच्या अध्यक्षपदी कालीदास जाजू तर सचिवपदी सुरज तापडिया
.png)
माजी प्रांतपाल हरीप्रसाद सोमाणी यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी पदग्रहण समारंभ
सोलापूर (कटूसत्य वृत्त):-रोटरी क्लब ऑफ सोलापूरच्या वर्ष २०२२-२३ सालाकरीता अध्यक्षपदी रोटे कालीदास जाजू तर सचिवपदी रोटे सुरज तापडियायांची निवड करण्यात आली असल्याची माहिती मावळते अध्यक्ष संजय पटेल यांनी दिली. पदग्रहण समारंभ रविवार ३ जुलै रोजी सायं. ६.३० वा. निर्मलकुमार फडकुल सभागृह येथे होणार असून यास रोटरी आंतरराष्ट्रीयचे रोटरी जिल्हा ३१३२ चे माजी प्रांतपाल हरीप्रसाद सोमाणी यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहाय्यक प्रांतपाल श्रीराम मुलकर्णी यांची उपस्थिती असणार आहे. याच प्रसंगी रोटरॅक्ट क्लब सोलापूर डायनॅनिकचे अध्यक्ष गितेश पोळ व सचिव अक्षयकुमार गायकवाड यांचाही पदग्रहणही संपल होईल.
ह्यावर्षी रेन वॉटर हार्वेस्टिंग, आरोग्य तपासणी शिबीर, वरिष्ठ नागरिकांकरीता साक्षरता अभियान, पर्यावरण
संवर्धन, स्वच्छता अभियान, किचन गार्डनींग, वृक्षारोपणासह, रक्तदान शिबीर, साक्षरता अभियान मोठ्या प्रमाणावर राबविण्याचा मानस असल्याचे नुतन अध्यक्ष कालीदास जाजू यांनी सांगितले.
रोटरी क्लब सोलापूरद्वारा अन्नपूर्णा योजने अंतर्गत गेली १५ वर्षांपासून १०० वयोवृध्द गरजूंना दररोज एक
वेळचे जेवण दिले जाते. तसेच कायमस्वरूपी कृत्रिम भिंगारोपण केंद्राद्वारे अत्यंत अल्पदरात जयपूर फूट बसविले जातात.
याशिवाय सायकल बँक प्रकल्पाअंतर्गत भु.मु. पुल्ली प्रशालेतील गरजू मुलींना सायकल वाटप करण्यात येत आहे. या सायकली मुलींचे शिक्षण होईपर्यंत त्यांच्याकडेच राहतात व नंतर इतर गरजूंना देण्यात येणाचे प्रयोजन करण्यात आले आहे. रोटरी नाना नानी पार्क, रोटरी उद्यान, रोटरी वन, रोटरी काव्य आदी कायमस्वरूपी प्रकल्प रोटरी कल्ब सोलापूर द्वारे राबविले जात आहेत. तसेच या वर्षी वृध्दांसाठी मनोधैर्य योजना हा नवीन प्रकल्प सुरु करण्यात आला आहे. नुतन अध्यक्ष कालीदास जाजू हे व्यापारी बँकेचे संचालक असून सिमेंट डिलर व्यवसाईक आहेत. ते दमाणी शाळा, चांडक ट्रस्ट आदी संस्थांवर कार्यरत आहेत. सचिव सुरज तापडिया हे ही सिमेंट डिलर असून माहेश्वरी जिल्हा सभा सोलापूरचे सक्रिय सदस्य आहेत.
इतर संचालक मंडळ खालीप्रमाणे उपाध्यक्ष व प्रेसिडेंट इलेक्ट २०२२-२३- डॉ. ज्योती चिडगुपकर,प्रेसिडेंट नॉमिनी २०२३-२४- सीए सुनिल माहेश्वरी, आयपीपी- संजय पटेल, सार्जंट अॅट आर्म्स - जयेश पटेल,ट्रेनर - सलाम शेख, खजिनदार - विशाल वर्मा, संचालक सर्वश्री कौशिक शाह, शिवाजी उपरे, विजकुमार गोयदानी,वासिम पटेल, सौ. विद्या मणुरे, सौ. शांता येळंबकर, डॉ. आनंद कांबले, डॉ. कैलास मुंदडा, मितेश पंचमिया, सुहास लाहोटी, अलोक गुप्ता, निलेश फोफलिया, डॉ. विजय शिवपुजे व संपादक राकेश सोनी.
0 Comments