नुपुर शर्मा व नवीन कुमार यांच्यावर कारवाई करा मुस्लिम बांधवांनी मूक मोर्चा काढून प्रशासनात दिले निवेदन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, June 11, 2022

नुपुर शर्मा व नवीन कुमार यांच्यावर कारवाई करा मुस्लिम बांधवांनी मूक मोर्चा काढून प्रशासनात दिले निवेदन

नुपुर शर्मा व नवीन कुमार यांच्यावर कारवाई करा मुस्लिम बांधवांनी मूक मोर्चा काढून प्रशासनात दिले निवेदन


या मोर्चासाठी वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा

                मोहोळ (कटूसत्य वृत्त):- भाजप प्रवक्त्या नुपूर शर्मा व नविन कुमार जिंदाल यांनी देशात जातिय व धार्मीक तेढ निर्माण करण्यासाठी महम्मद पैगबर यांच्या बद्दल अपशब्द व घाणेरडे शब्द वापरल्याबद्दल यांचेवर त्वरित कायेदशिर कारवाई कारून अटक करण्यात यावे. नुपूर शर्मा व नविन कुमार जिंदाल यांनी महम्मद पैगबंर यांच्या बद्दल अपशब्द व घाणेरडे शब्द वापरून पुर्ण भारत देशातील मुस्लीम समाजाच्या भावना दुखविल्याने यांचे विरोधात कारवाई करण्यात यावी. याबाबतचे निवेदन मुस्लिम बांधवांच्या वतीने देण्यात आले आहे.

                यासाठी शनिवार दिनांक ११/०६/२०२२ रोजी मोहोळ शहरातून बहुसंख्येने सर्व मुस्लीम बांधव यांचे वतीने सकाळी ११ वाजता मुख मोर्चा अत्यंत शांततेतपोलीस प्रशासनाने दिलेल्या नियमाचे पालन करून अत्यंत शांत हा मोर्चा महबूब सुभानी दर्गा येथून निघून तहसील कार्यालय येथे तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.

                सदरचे निवेदन हे तहसीलदार यांना मुफ्ती जुबेर सुर्की , हाफीज मुजीब शेख,मौलाना बिलाल  इशाअती, हाफिज सादिक इनामदार, आलीहजरत काझी, मुक्तार सुरकी खाजाभाई शेख सुभान , बिलाल शेख, अन्सार कुरेशी डॉ. जिलानी खान, बिलाल शेख यांच्या हस्ते देण्यात आले. मूक मोर्चा साठी सर्व शहरातील शेकडो मुस्लीम बांधव उपस्थित होते. या मूक मोर्चा दरम्यान पोलीस निरिक्षक अशोक सायकर यांनी पोलिसांचा चोख बंदोबस्त होता यावेळी सायकर यांचे मुस्लीम समाज बांधवाच्या वतीने आभार मानण्यात आले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages