राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेचे उमेदवार सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांच्याकडून अभिनंदन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, June 10, 2022

राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेचे उमेदवार सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांच्याकडून अभिनंदन

राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेचे उमेदवार सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांच्याकडून अभिनंदन

ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांचे आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांच्याकडून अभिनंदन

                 सांगोला (कटुसत्य वृत्त): राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर व महाराष्ट्रातील विधानसभेचा प्रदीर्घ अनुभव असलेले ज्येष्ठ नेते एकनाथरावजी खडसे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून खा.शरदचंद्रजी पवार, उपमुख्य मंत्री ना. अजित दादा पवार आणि प्रदेश अध्यक्ष ना. जयंतरावजी पाटील यांनी विधान परिषदेची उमेदवारी नुकतीच जाहीर करण्यात आली. याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष, नवी मुंबईचे निरीक्षक आणि विधान परिषदेचे मा.आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांनी शुक्रवार दि 10 रोजी विधान भवन मुंबई येथे दोन्ही ज्येष्ठ नेत्यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

                 यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती व शिवसेनेच्या नेत्या आम. नीलमताई गोर्‍हे फलटणचे आमदार दिपक चव्हाण राष्ट्रवादी काँग्रेस उद्योग व्यवसाय सेलचे प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब देशमुख आदींसह मान्यवर उपस्थित होते. विधान परिषदेचे सभापती म्हणून रामराजे नाईक निंबाळकर यांची कारकीर्द अतिशय उल्लेखनीय व सभागृहाची समृद्ध परंपरा कायम ठेवणारी तसेच सभागृहाची प्रतिष्ठा उंचावणारी अशीच ठरली आहे. राज्याच्या राजकारणातील एक स्वच्छ प्रतिमेचा नेता म्हणून रामराजेंची ओळख आहे. रामराजेंच्या उमेदवारीमुळे पक्षाला मोठा फायदा होणार आहे. त्यांचा प्रशासनातील काम करण्याचा अनुभव दांडगा आहे. तसेच ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनाही विधिमंडळात काम करण्याचा अनेक वर्षांचा अनुभव आहे महाराष्ट्र राज्य विधिमंडळात त्यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते, महसूल मंत्री यासह अनेक महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने आजवर या दोन्ही नेत्यांनी केलेल्या कामाचा अनुभव लक्षात घेऊनच महाराष्ट्र विधान परिषदेच्या रिक्त जागेवर रामराजे नाईक निंबाळकर आणि एकनाथराव खडसे या जेष्ठ नेत्यांना संधी दिली आहे.  

                 आम. दिपकआबा साळुंखे पाटील आणि विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे संबंध अतिशय जिव्हाळ्याचे आहेत. सभापती रामराजे नाईक निंबाळकर हे आम. दिपकआबांवर पुत्रवत प्रेम करतात. पुन्हा एकदा विधानपरिषदेसाठी रामराजेंना संधी मिळताच विधानभवन मुंबई येथे जावून मा. आम. दिपकआबांनी रामराजे यांचे अभिनंदन केले व विजयासाठी शुभेच्छा दिल्या.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages