Hot Posts

6/recent/ticker-posts

शिक्षक सहकार संघटनेचा पुरोगामी सेवा मंडळास जाहीर पाठींबा

 शिक्षक सहकार संघटनेचा पुरोगामी सेवा मंडळास जाहीर पाठींबा

 शिक्षक बँकेत सभासद हिताचाच कारभार रविराज खडाखडे

बेंबळे(कटूसत्य वृत्त):-प्राथमिक शिक्षक बँकेत सत्ताधारी शिक्षक समितीच्या नेतृत्वाखाली पुरोगामी शिक्षक मंडळाने पारदर्शक काम करून कर्जाचा व्याजदर एक अंकी आणला, सभासद वर्गणी अकराशे रुपये वरून सातशे रुपये केला तसेच सुलभ कर्ज वाटप केले. त्यामुळे सोलापूर येथील शिक्षक सहकार संघटनेने निवडणुकीत सत्ताधारी पुरोगामी सेवा मंडळाला पाठिंबा दिल्याचे जिल्हाध्यक्ष रविराज खडाखडे यांनी सांगितले.शिक्षक सहकार संघटनेच्या सोलापूर शाखेने पुरोगामी शिक्षक मंडळास पाठिंब्याचे पत्र दिले. यावेळी विश्वनाथ मिरजकर, किसन पाटील, शशिकांत भागवत, सोलापूर जिल्हाध्यक्ष अनिल बापू कादे, सरचिटणीस अमोगसिद्ध कोळी, विद्यमान चेअरमन यु.टी.जाधव उपस्थित होते. यावेळी शिक्षक सहकार संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष दीपक परचंडे, राज्य सचिव निलेश देशमुख,सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र जेटगी, सरचिटणीस सचिन निरगिडे, दक्षिण तालुकाध्यक्ष सिद्धाराम कोळी,सचिव सोमलिंग बिराजदार,उत्तर तालुका अध्यक्ष राजेंद्र पडदुणे, सचिव सत्यनारायण नडीमेटला आदी उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments