मराठा सेवासंघाच्या वधुवर सुचीचे थाटात प्रकाशन

नववधुराच्या पालकांसाठी ही सुची मार्गदर्शक : अमोल शिंदे
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- मराठा सेवासंघाच्या वधुवर सुुचीचा प्रकाशन सोहळा मराठा नागरी सहकारी पतसंस्था येथे मोठ्या थाटात पार पडला पंतसंस्थेचे चेअरमन तथा पालिकेचे मा.विरोधीपक्षनेते अमोल शिंदे यांच्या हस्ते या सुचीचे प्रकाशन करण्यात आले. नववधुवरांच्या पालकांसाठी ही सुची मार्गदर्शक ठरेल असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला.
सोमवारी हा प्रकाशन सोहळा पारपडला यावेळी विचार पिठावर उद्योजक राजेंद्र हजारे, बिल्डर्स असोशिएशनचे राज्य अध्यक्ष दत्ता मुळे, युवा उद्योजक संतोष चव्हाण, मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष प्रशांत पाटील उपस्थित होते. शिवस्मारक सभागृहात झालेल्या वधुवर मेळ्याव्यास समाजबांधवानी मोठा प्रतिसाद दिला होता. या मेळ्याव्यात नोंदणी झालेल्या वधुवरांची माहिती समाजबंधवासाठी एकत्र मिळावी म्हणून वधूवर कक्षाच्यावतीने पुस्तक रूपात सुची तयार केली आहे. यामध्ये शहर जिल्ह्यातील वधुवराची नावं, पत्ता, मोबाईल नंबरसह माहिती संकलन करून सादर केली आहे.
यावेळी राजेंद्र हजारे,दत्ता मुळे, संतोष चव्हाण यांनी मार्गदर्शन केले. मराठा नागरी पंतसंस्थेचे चेअरमन अमोल शिंदे यांनी मराठा सेवा संघाची सुची नववधुवराच्या पालकांसाठी मार्गदर्शक ठरणार असल्याचे मनोगत व्यक्त केले. प्रारंभी जिजाऊ वंदना झाली त्यानंतर मराठा सेवासंघाचे जिल्हाध्यक्ष प्रशांत पाटील यांनी प्रास्ताविकामधे वधुवर सुची काढण्याची भुमिका विशद केली.
यावेळी अविनाश गोडसे, चेतन चौधरी, कल्याण गव्हाणे, आर.पी .पाटील,परशुराम पवार, राम माने, नितीन जाधव, नवनाथ कदम, राजू मिरकले, सोमनाथ राऊत, गोवर्धन गुंड, आंबादास सपकाळ, अजित सगरे, रमेश जाधव, वासुदेव घाडगे, उबाळेसर, लता ढेरे, अभिजंली जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शहराध्यक्ष सदाशिव पवार यांनी केले आणि आभार प्रा. लक्ष्मण महाडीक यांनी मानले.
No comments:
Post a Comment