कुर्डूवाडी शहर बंद व ठिय्या आंदोलन..!


सर्व पक्षीयचा वतीने निषेध नोंदविण्यात आला
कुर्डूवाडी (कटुसत्य वृत्त):- मुस्लिम धर्मियांचे प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या बद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाच्या निषेधार्थ कुर्डुवाडी शहर मुस्लिम समाजाच्या वतीने शहर बंदची हाक देण्यात आली अत्यावश्यक सेवा वगळता शहरातील सर्व दुकाने,मंडई,व्यापारपेठ दिवसभर बंद होती.दरम्यान दुपारी तीनच्या सुमारास गांधी चौक येथे ठिय्या आंदोलन करून मनोगते व्यक्त करण्यात आल्या.
समाजात तेढ निर्माण करून मुस्लिम समाजाच्या भावना दुखावलेल्या नुपूर शर्मा,नवीन कुमार जिंदाल यांना त्वरित अटक करून कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी समस्त मुस्लिम बांधव,आर.पी.आय.अल्पसंख्याक विभाग माढा तालुका तसेच काँग्रेस कमिटी व अल्पसंख्याक विभागाच्या वतीने प्रांताधिकारी ज्योती कदम यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.सदरच्या निवेदनाची प्रत नायब तहसीलदार रविकिरण कदम यांनी स्विकारली.
यावेळी मौलाना अमान सिद्दिकी, मौलाना नवाज गौस सय्यद,किफायत शेख,समीर मुलाणी,वलीमोहम्मद मुलाणी,वाजिद कुरेशी,वाहेद शेख,वसीम मुलाणी,
डॉ.मोहसीन मकणू, हाफिज गनी,नासीर दाळवाले,इम्रान शेख,फिरोज खान,हमीद शिकलकर,आर्षद मुलाणी,बाबा बागवान, फैयाज शेख, अफरोज तांबोळी,अजीज पटेल,अब्दुल मदारी,शब्बीर शेख,आब्दुल खान,मुसाहिद खान,तौसीफ बागवान, शकील अत्तार,रफीक शेख,रफीक सय्यद,मज्जीद बागवान,मिठ्ठूमिया शेख,साबीर चाऊस,हाज्जु शेख,राजु काझी, यांच्यासह शहर परिसरातील मुस्लिम बांधव बहुसंख्येने उपस्थित होता.या ठिय्या आंदोलनाची सांगता राष्ट्रगीताने संपन्न झाली.
No comments:
Post a Comment