धनंजय महाडिक यांच्या विजयाने भीमा परिवारामध्ये जल्लोष - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, June 13, 2022

धनंजय महाडिक यांच्या विजयाने भीमा परिवारामध्ये जल्लोष

 धनंजय महाडिक यांच्या विजयाने भीमा परिवारामध्ये जल्लोष


 फटाक्यांची आतषबाजी, गुलालाची मुक्तपणे उधळण

टाकळी सिकंदर (कटूसत्य वृत्त):- महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या राज्यसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेचे अर्थात महाविकास आघाडीचे उमेदवार संजय पवार यांच्यावर भाजपाचे धनंजय महाडिक यांनी मात करत दणदणीत विजय खेचून आणल्याबद्दल मोहोळ तालुक्यातील टाकळी सिकंदर येथील भीमा सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर भीमा परिवाराच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत जेसीबीच्या सहाय्याने गुलालाची मुक्तपणे उधळण करत डॉल्बीव,बॅन्जो च्या तालावर हजारो कार्यकर्त्यांनी प्रचंड जल्लोष केला.काल दि.१० रोजी राज्यसभेच्या सहा जागांसाठी महाराष्ट्र विधानसभा परिसरात मतदान प्रक्रिया पार पडली. सर्व पक्षांचे ५ जागांचे पक्षीय संख्याबळ निश्चित होते. मात्र सहाव्या जागेसाठी कोणत्याच पक्षाकडे मजबूत संख्याबळ नव्हते. त्यामुळे या जागेसाठी सुरुवातीपासून इरस आणि चूरस पहावयास मिळाली. या जागेसाठी प्रमुख्याने छत्रपती संभाजीराजे भोसले यांचे नाव पुढे आले होते. मात्र त्यांनी माघार घेतली. याच जागेसाठी भाजपकडून भीमा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन धनंजय महाडिक यांचे नाव पुढे आले आणि उमेदवारी देखील फायनल केली. तर शिवसेनेकडून अर्थात महाविकासआघाडी कडून कोल्हापूरचेच संजय पवार यांची उमेदवारी फायनल झाली. धनंजय महाडिक व संजय पवार यांच्यामध्ये चुरशीच्या सामन्यात धनंजय महाडिक यांना ४१ मते पडली तर संजय पवार यांना ३३ मते पडल्याने ते पराभूत झाले. दरम्यान काल दिवसभर निकालाकडे आतुरतेने लक्ष ठेवून असलेल्या भीमा परिवाराच्या कार्यकर्त्यांनी आज पहाटे निकालाची माहिती मिळताच भीमा कारखाना कार्यस्थळावर घेऊन मोठा जल्लोष केला. कारखान्याचे संस्थापक कै.भीमरावदादा महाडिक यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी व्हाईस चेअरमन सतीश जगताप, युवा नेते विनोद महाडिक, कार्यकारी संचालक सूर्यकांत शिंदे, भाजपचे तालुकाध्यक्ष सुनील चव्हाण, जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब जाधव, संचालक दादासाहेब शिंदे, बापूसाहेब चव्हाण, बिभीषण वाघ, तुषार चव्हाण, प्रभाकर देशमुख, गणपत पुदे, राजेंद्र टेकळे, अनिल गवळी, बापू जाधव, दिलीप रणदिवे, सिद्राम मदने, बापू गवळी, प्रवक्ते पांडुरंग ताटे, राजाराम बाबर, झाकीर मुलाणी, भारत पाटील, संग्राम चव्हाण, पं.स.सदस्या मुबिना मुलानी, सुरेश सावंत, युवराज चौगुले, आनंद जाधव, बंडू शेख, डॉ. किलमीसे, संतोष चव्हाण, विश्वास पांढरे, जमीर मुजावर यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages