मोहोळ तालुक्यातील वडवळ येथे वाळू चोरी वर मोहोळ पोलिसांची कारवाई

टेम्पो वाळू सह १५ लाखाचा मुद्देमाल हस्तगत
मोहोळ (कटूसत्य वृत्त):-मोहोळ तालुक्यातील वडवळ येथे मोहोळ पोलिसांनी दोन टेम्पो वर कारवाई करून वाळूसह १५ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून चार जणांवर मोहोळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .याबाबत मोहोळ पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, मंगळवार दि २१ जुन रोजी मोहोळ पोलीस ठाण्याचे पथक रात्री पेट्रोलींग करित असताना वडवळ पुलाजवळ समोरून दोन टॅम्पो आलेले दिसले आम्हाला सदर टॅम्पो मध्ये वाळू असल्याचा संशय आल्याने पथकाने सदरचे टॅम्पो थांबवुन तपासले असता दोन्ही टॅम्पो मध्ये वाळु मिळुन आली सदर बाळु बाबत चालकाकडे विचारना केली असता चालकाने कोणत्याही प्रकारची रॉयल्टी पावती नसल्याचे सांगितले त्यांना कोठुन वाळु आणली आहे असे विचारले असता त्यांनी सिना नदी पात्रातून आणली असल्याचे सांगितले त्यावरून दोन्ही टॅम्पो व सिना नदी पात्रातील आष्टे बंधारा येथे केलेल्या वाळुच्या
स्टॉकची पाहणी केली असता सर्व ठिकाणची मिळुन एकुन २४ ब्रास वाळु व दोन टॅम्पो असे एकुन १५ लाख ९ ० हजार रू . चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये आरोपी नागेश आण्णा वाघमोडे (रा नजीक पिंपरी ) उमेश दादाराव शिरसट (रा भोयरे) श्रीकांत दत्तात्र यादव (रा . दत्तनगर मोहोळ) बाळासाहेब सत्यवाण शिंदे (रा . भोयरे) यांचेवर मोहोळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.
सदरची कारवाई पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपूते, अप्पर पोलीस अधिक्षक हिम्मतराव जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अशोक सायकर पोहे कॉ. शरद ढावरे , पोना. विठ्ठल पठाडे , पोकॉ पांडुरंग जगताप , पोकॉ मोहोन पवार , चालक पोकॉ शिवने व पोकॉ. नानासाहेब वाघमोडे यांनी केली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक अशोक सायकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक महेश कटकधोंड हे करीत आहेत.
No comments:
Post a Comment