वाशिममधील भाजपच्या पदाधिकार्‍यांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश... - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, June 2, 2022

वाशिममधील भाजपच्या पदाधिकार्‍यांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश...

वाशिममधील भाजपच्या पदाधिकार्‍यांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश...

              मुंबई (नासिकेत पानसरे):- उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच वाशिम जिल्हाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांच्या पुढाकाराने भाजप पक्षातील अनेक मान्यवरांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. 

              राष्ट्रवादी भवन, मुंबई येथे घेण्यात आलेल्या या कार्यक्रमात भाजपचे माजी नगराध्यक्ष भगवानराव क्षीरसागर, किरण क्षीरसागर, तालुकाध्यक्ष गजानन दहातोडे, कपिल नकवाल, अनिल अग्रवाल यांनी पक्षात प्रवेश केला. या पक्षप्रवेश कार्यक्रमाला वाशिम जिल्ह्यातील पक्षाचे वरिष्ठ नेते अंकुश देशमुख, बाबाराव खडसे, सोनाली ठाकूर, युसुफ पुंजाणी, दत्ता डहाके, अशोक परळीकर उपस्थित होते.

              याच दरम्यान नवी मुंबईतील जिल्हाध्यक्ष अशोक गावडे यांच्या पुढाकाराने आप पक्षातील दत्तात्रय नागरे ( माजी सहा. आयुक्त, नवी मुंबई महानगरपालिका ) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे घड्याळ हाती बांधले. त्यांच्यासमवेत सचिन सावंत, चंद्रकांत पाटील यांनीही पक्षात प्रवेश केला.

              यावेळी प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, महिला प्रदेशाध्यक्षा विद्याताई चव्हाण, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव, युवक कार्याध्यक्ष सूरज चव्हाण आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages