कोरोना महामारीत डोंबे हॉस्पिटलचा सेवाभाव रूग्णाला दिलासा देणारा - ॲड विजयसिंह चव्हाण

डोंबे हॉस्पिटल व लायन्स क्लब आयोजित सर्व रोगनिदान शिबिरामध्ये १०२ रुग्णांची तपासणी
सांगोला (कटूसत्य वृत्त):- कोरोना महामारीत अनेक लोकांची वैद्यकीय उपचारासाठी अडचण निर्माण झाली होती.अशा परिस्थितीमध्ये सांगोला शहरांमध्ये डोंबे हॉस्पिटलकडून रूग्णाला दिला जाणारा सेवाभाव खूप महत्त्वाचा व दिलासा देणारा होता.असे प्रतिपादन लायन्स क्लब ऑफ सांगोला संचालक जेष्ठ विधिज्ञ विजयसिंह चव्हाण यांनी केले.येथील डोंबे हॉस्पिटलच्या चतुर्थ वर्धापन दिनानिमित्त डोंबे हॉस्पिटल व लायन्स क्लब ऑफ सांगोला तर्फे आयोजित सर्वरोग निदान शिबीर उद्घाटन समारंभामध्ये ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर कॅबिनेट ऑफिसर एम.जे.एफ,ला. उत्तम बनकर,सां.ता.शि.प्र.मंडळ सांगोला सचिव म.शं.घोंगडे, सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य भीमाशंकर पैलवान, डोंबे हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. शैलेश डोंबे,डॉ.सौ.जीवनमुक्ती डोंबे, शंकरराव डोंबे, डोंबे गुरूजी, लायन्स क्लब सांगोला अध्यक्ष ला.प्रा.धनाजी चव्हाण, सचिव ला.उन्मेश आटपाडीकर, खजिनदार काकासो नरूटे उपस्थित होते. यावेळी कॅबिनेट ऑफिसर ला.उत्तम बनकर यांनी डॉ,डोंबे व डोंबे हॉस्पिटलच्या कार्याबद्दल कौतुक करत पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
या शिबिरामध्ये दमा व फुफ्फुसाची स्पायरोमेट्री मशीनद्वारे तमासणी,रक्तातील हिमोग्लोबिन,रक्तातील साखरेचे प्रमाण इत्यादी एकूण १०२ रुग्णांची मोफत तपासणी व योग्य सल्ला व देण्यात आला.यावेळी डोंबे हॉस्पिटल व लायन्स क्लब सांगोला पदाधिकारी, सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उद्घाटन कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य ला.भीमाशंकर पैलवान यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सचिव ला.उन्मेश आटपाडीकर यांनी केले.
0 Comments