Hot Posts

6/recent/ticker-posts

आपुलकी प्रतिष्ठानच्या वतीने आश्रम शाळा सोनंद येथे शैक्षणिक साहित्य वाटप

 आपुलकी प्रतिष्ठानच्या वतीने  आश्रम शाळा सोनंद येथे शैक्षणिक साहित्य वाटप

सोनंद (कटूसत्य वृत्त):-आपुलकी प्रतिष्ठान सांगोला यांचे वतीने केंद्रीय अनुसूचित जाती प्राथमिक आश्रम शाळा सोनंद येथे शाळाप्रवेशदिनी बुधवारी शालेय दप्तर, वह्या व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी त्यांच्या हस्ते पाठ्यपुस्तके व युनिफॉर्मचेही वाटप करण्यात आले.
              यावेळी आपुलकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र यादव यांनी आपुलकी प्रतिष्ठान अनेक गरजू व वंचित लोकांना वारंवार मदत करीत असून या शाळेच्या विद्यार्थ्यांची गरज ओळखून त्यांना लागणाऱ्या शैक्षणिक साहित्याची  मदत करत आहोत. यापुढे कोणतीही गरज लागली  तर आपुलकीचा हात आपल्या पाठीवर कायम राहील अशीच सद्भावना व्यक्त केली. आपुलकी चे संचालक अरविंद  केदार  म्हणाले की,  आपुलकीच्या  वतीने मोक्ष रथाचे काम हाती घेतले असून अंतिम विधीच्या सोईची ची तयारी करत असतानाच आयुष्याची सुरुवात करणाऱ्या विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन आपुलकीने गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्याचा निर्णय घेतला. या माध्यमातून देशाची नवीन पिढी ज्ञानसंपन्न निर्माण व्हावी यासाठी आपुलकीने केलेला हा छोटासा प्रयत्न आहे.
                 या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रस्ताविक मुख्याध्यापक दिगंबर साळुंखे व आभार ज्योतिराम माने यांनी मानले.यावेळी संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र यादव, सचिव संतोष महिमकर,संचालक अरविंद केदार, विकास देशपांडे साहेब, रमेश देवकर, सुनील मार्डे, उमेश चांडोले,कॉन्ट्रॅक्टर प्रफुल्ल केदार, संस्थेचे महेश बाबर,शरद बाबर,राजकुमार बाबर,उद्योगपती धनंजय भिंगे,पालक धनाजी महाडिक जितेंद्र पाटील,पप्पू काशीद,सिद्धेश्वर पाटील यांचेसह संगीता हाके,अर्चना काशीद,ज्योतिराम माने,रमेश गळवे,यासिन शेख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments