सांगोला विद्यामंदिरमध्ये विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत

सांगोला (कटूसत्य वृत्त):- सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेजमध्ये शैक्षणिक वर्ष सन २०२२-२३ च्या सुरुवातीला काल बुधवार दिनांक १५ जून २०२२ रोजी शाळेच्या पहिल्या दिवशी सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य भीमाशंकर पैलवान, उपमुख्याध्यापक लक्ष्मण जांगळे, उपप्राचार्य गंगाधर घोंगडे, पर्यवेक्षक बिभीषण माने, अजय बारबोले, पोपट केदार व ज्येष्ठ शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे प्रातिनिधिक स्वरूपात पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.व शैक्षणिक वर्ष सन २०२२-२३ साठी शुभेच्छा दिल्या.यावेळी सकाळच्या सत्रात इयत्ता नववी दहावी, ज्युनिअर कॉलेज इयत्ता बारावी व दुपारच्या सत्रात इयत्ता पाचवी ते आठवीचे विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते..
0 Comments