Hot Posts

6/recent/ticker-posts

पावसाळ्यात वाहन चालवताना खबरदारी घ्या !

 पावसाळ्यात वाहन चालवताना खबरदारी घ्या !

पुणे (कटूसत्य वृत्त):-  हवामानामुळे होणाऱ्या अपघातांपैकी निम्मे प्रमाण हे पावसाळ्यातील असते. पावसामध्ये रस्ते ओले व निसरडे होणे, खड्डे पडणे, पावसामुळे दृश्‍यमानता कमी अशी अनेक कारणे अपघातांना कारणीभूत ठरते.त्यामुळे पावसाळ्यात वाहन चालविताना खबरदारी घ्यावी, असे आवाहन राज्य परिवहन विभागाने वाहन चालकांना केले आहे.

पावसात वाहनासह बाहेर पडताना विंडशिल्ड वायपर्स, हेडलाइट, टेललाइट्‌स, ब्रेक्‍सची तपासणी करा. पावसाळ्यात वाहन नेहमी हळू चालवावे. नदी पुलावरून पाणी वाहत असेल तर वाहने घेऊ जाऊ नका. दृश्‍यमानता कमी असल्यामुळे हेडलाइट सुरू ठेवावेत, अशा सूचना परिवहन विभागाने दिल्या आहेत.

*पावसाळ्यात अपघात टाळण्यासाठी सूचना.

बाहेर पडताना कार दोन वेळा तपासा.

टायर्सकडे विशेष लक्ष देणे आवश्‍यक.

पावसात हेडलाईट्‌स सुरू ठेवा.

दोन वाहनांनमध्ये सुरक्षित अंतर ठेवा.

पुढे असलेल्या वाहनांच्या ट्रॅकवरूनच जा.

साचलेल्या पाण्यात गाडी नेणे टाळा.

नेहमी चिडशिल्ड वायपर्सचा वापर करा.

Reactions

Post a Comment

0 Comments