सोलापूर येथील खेळाडूंचे तायक्वांदो राष्ट्रीय पंच परीक्षेत यश

सांगोला (कटूसत्य वृत्त):- सातारा जिल्हा अमुचेर तायक्वांदो असोसिएशन आयोजित,तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र व इंडिया तायक्वांदो यांचे मान्यतेने दि,25 व 26 जून 2022 रोजी शाहू स्टेडियम सातारा येथे घेण्यात आलेल्या वर्ल्ड तायक्वांदो न्यू रुल्स अँड रेग्युलेशन जून 2022 नॅशनल रेफ्रि आणि नॅशनल रिफ्रेशर कोर्स मध्ये तायक्वांदो असोसिएशन ऑफ सोलापूर डिस्ट्रिक्ट च्या खेळाडूंनी यश संपादन केले,यशस्वी खेळाडू पुढील प्रमाणे नॅशनल रिफ्रेशर कोर्स मध्ये प्रमोद दौंडे,नेताजी पावर,नॅशनल रेफ्रि जोहिल जाधव,वैष्णवी सुरवसे,सत्यम कांबळे,प्रतीक होमकर,यांनी यश मिळवले सदर परीक्षेला आंतरराष्ट्रीय पंच मास्टर पीटर फर्नांडिस गोवा, तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र च्या एक्सिक्युटिव मेंबर उषा शिर्के मॅडम,हे होते,सदर परीक्षा तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र चे अध्यक्ष श्री,आबा झोडगे,सचिव श्री,संदीप ओंबसे,गफार पठाण यांचे मार्गदर्शन खाली पार पडल्या ,यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन तायक्वांदो असोसिएशन ऑफ सोलापूर चे अध्यक्ष मा,आ.शहाजी बापू पाटील,उपअध्यक्षा शिवराज मुगळे,खजिनदार गुरुलिंग गंगनहळ्ळी,सोमनाथ बनसोडे,अंकुश मोरे, महेश बनकर,जालिंदर साळवे,यांनी केले.
0 Comments