सांगोला येथे दि.२९ जुन रोजी डाळिंब फळपिक समुह विकास कार्यक्रमाअंतर्गत घेण्यात येणार शेतकरी मेळावा

सांगोला (कटूसत्य वृत्त):- राष्ट्रीय बागवानी बोर्ड ,कृषि व किसान कल्यान मंत्रालय भारत सरकार व महाराष्ट्र राज्य फलोत्पादन व औषधी वनस्पती मंडळ पुणे, कृषि विभाग, महाराष्ट्र शासन यांचे संयुक्त विद्यमाने दिनांक २९ जुन २०२२ रोजी सकाळी ९.०० वा रामकृष्ण गार्डन,वाढेगाव रोड , सांगोला येथे डाळिंब फळपिक समुह विकास कार्यक्रम अंतर्गत शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सदरील शेतकरी मेळाव्याचे उद्घाटन मा. जिल्हाधिकारी सोलापूर मिलिंद शंभरकर (भा.प्र.से) यांचे उपस्थितीत करण्यात येणार आहे.
शेतकरी मेळाव्यामध्ये सोलापूर जिल्ह्यासाठी मंजुर झालेल्या डाळिंब फळपिक समुह विकास कार्यक्रमाविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.त्याचबरोबर वेगवेगळ्या योजना , तंत्रज्ञान , प्रक्रिया , निर्यात याविषयी मार्गदर्शन होईल. सदरील कार्यक्रमास राष्ट्रीय बागवानी बोर्ड,कृषि विभाग, आत्मा ,समुह विकास संस्था व कार्यक्रम व्यवस्थापण युनिट , अपेडा , पणन मंडळ,नाबार्ड , राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र सोलापुर,कृषि विज्ञान केंद्र मोहोळ , संशोधन संस्था,अखिल महाराष्ट्र डाळिंब उत्पादक संशोधन संघ, भारतील डाळिंब उत्पादक संघ , अग्रणी बँक , वित्तीय संस्था ,निर्यातदार , कृषि निविष्टा कंपण्या, शेतकरी उत्पादक कंपण्या , रोपवाटिकाधारक यांचा सहभाग असणार आहे. तरी शेतकरी मेळाव्यास जास्तित जास्त डाळिंब उत्पादक शेतकरी बांधवांनी सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी सोलापुर बाळसाहेब शिंदे यांचेकडुन करण्यात आले आहे.
0 Comments