जागतिक सायकल दिनानिमित्त सायकल रॅलीचे आयोजन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, June 6, 2022

जागतिक सायकल दिनानिमित्त सायकल रॅलीचे आयोजन

जागतिक सायकल दिनानिमित्त सायकल रॅलीचे आयोजन

सोलापूर (कटुसत्य वृत्त): राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांचे निर्देशान्वये दि. 03 जून 2022 रोजी जागतिक सायकल दिनानिमित्त जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सोलापूर आणि हिराचंद नेमचंद कॉलेज ऑफ कॉमर्स यांचे संयुक्त विद्यमाने सोलापूर शहरामध्ये सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. या सायकल रॅलीची सुरवात जिल्हा विधी सेवा प्रधिकरण, सोलापूर येथून करण्यात आली. रॅलीचे उद्घाटन प्रभारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश, सोलापूर मा. श्री. व्ही.एच. पाटवदकर यांचे हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आले. यावेळी प्रभारी सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सोलापूर तथा दिवाणी न्यायाधिश वरिष्ठ स्तर, सोलापूर मा. श्री. बी.सी. मोरे, मुख्य न्यायदंडाधिकारी श्री. व्ही. आय. भंडारी, इतर न्यायिक अधिकारी, जेष्ठ विधिज्ञ श्री. एल.एन. मारडकर, विधिज्ञ संघाचे खजिनदार श्री. सी.पी. गायकवाड, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सोलापूर येथील पॅनल विधिज्ञ, कर्मचारी व महाविदयालयीन विदयार्थी उपस्थित होते.

सायकल रॅलीचे उद्घाटनानंतर रॅलीची सुरूवात जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सोलापूर येथून करण्यात आली. ही रॅली रंगभवन, हरीभाई देवकरण प्रशाला, डफरीन चौक मार्गे रेल्वे स्टेशन येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे पुतळयास प्रदक्षिणा घालून त्याचमार्गे जिल्हा न्यायालय, सोलापूर येथील प्रांगणात येवून रॅलीची सांगता झाली. या सायकल रॅलीमध्ये विधी सेवा प्राधिकरण, सोलापूर येथील पॅनल विधिज्ञ,विधी महाविदयालयीन विदयार्थी तसेच मोठया संख्येने न्यायालयीन कर्मचारी सहभागी होते. सायकल रॅलीच्यावेळी कायदेशीर हक्काची माहिती देणारे फलक प्रदर्शित करण्यात आले.

या सायकल रॅलीचे प्रमुख आकर्षण दोन चिमुकले बालक नामे पार्थ आणि देवांश क्षिरसागर हे ठरले. त्यांनीही रॅलीत सक्रीय सहभाग नोंदवून मनोगत व्यक्त केले. सदर कार्यक्रमाची प्रस्तावना मा. श्री. बी.सी. मोरे, प्रभारी सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सोलापूर यांनी केली. या कार्यक्रमास उपस्थित मा. श्री. व्ही.आय. भंडारी, मुख्य न्यायदंडाधिकारी, सोलापूर यांनी सायकल चालविण्याचे महत्व सांगितले.

या कार्यक्रमाच्या प्रसंगी मा. श्री. व्ही. एच. पाटवदकर, प्रभारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश, सोलापूर यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले व आरोग्यासाठी आणि ध्वनी व वायु प्रदूषण टाळण्यासाठी सायकल हे महत्वाचे साधन असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती एस. ए. साळुंखे, सह दिवाणी न्यायाधीश क.स्तर, सोलापूर यांनी केले. अॅड. कु. देवयानी किणगी यांनी आभार प्रदर्शन व्यक्त केले.

या सायकल रॅली व कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्याकरीता हिराचंद नेमचंद कॉलेज ऑफ कॉमर्सचे प्राध्यापक डॉ. श्रीनिवास जगताप, प्राध्यापक राजेंद्र रावळ, वालचंद कॉलेज ऑफ आटर्स अॅन्ड सायन्सचे प्राध्यापक डॉ. गोरे तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सोलापूरचे कर्मचारी श्री. एस. एस. शहापुरे, श्री. सचिन वडतीले श्रीमती के. वाय.चव्हाण, श्री बाजीराव जाधवर, श्री. ए.बी. शेख, श्रीमती एस.एच. दापुरे यांनी परिश्रम घेतले. तसेच या सायकल रॅलीप्रसंगी पोलीस विभाग व वाहतूक नियंत्रण शाखा यांनी बंदोबस्त व वाहतूकीचे नियोजन करुन सहकार्य केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages