मोहोळ नगर परिषदेची प्रभागनिहाय आरक्षण सोडत जाहीर - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, June 13, 2022

मोहोळ नगर परिषदेची प्रभागनिहाय आरक्षण सोडत जाहीर

 मोहोळ नगर परिषदेची प्रभागनिहाय आरक्षण सोडत जाहीर



मोहोळ (कटूसत्य वृत्त):-राज्यनिवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मोहोळ नगरपरिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज आरक्षण सोडत पार पडली मोहोळ नगर परिषदेच्या वीस जागेसाठी  आरक्षण सोडत सोमवार दि१३ जुन रोजी जाहीर करण्यात आली. ही सोडत  मोहोळ नगर परिषदेच्या मीनाताई ठाकरे बालोद्यान सभागृहामध्ये करण्यात आली आहे. या सोडतीसाठी नियंत्रक म्हणून उपजिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी हेमंत निकम मुख्याधिकारी डॉ. योगेश डोके यांच्या उपस्थितीमध्ये आरक्षण काढले. मोहोळ नगर परिषदेमध्ये 20 नगरसेवक निवडून द्यायचे आहेत त्यामध्ये 50% आरक्षणानुसार १० महिला  नगरसेविका म्हणुन निवडून जाणार आहेत.
मोहोळ नगरपरिषदेची निवडणूक ही दहा प्रभागातून द्विसदस्यीय प्रभाग रचनेनुसार पुनर्रचना  वीस जागेसाठी निवडणूक होणार आहे. त्यामध्ये प्रभाग क्रमांक दोन आणि चार अ ची जागा ही महिला अनुसूचित जाती साठी तर ब ची जागा सर्वसाधारण असेल तर प्रभाग क्रमांक पाच अ ची जागा अनुसूचित जाती पुरुष तर ब ची जागा सर्वसाधारण चिठ्ठीद्वारे हे आरक्षण काढण्यात आले. त्यामधील इतर राहिलेले प्रभाग क्रमांक एक, तीन, सहा, सात, आठ, नऊ, आणि दहा या प्रभागांमध्ये यासाठी  अ ची जगा महिला सर्वसाधारण व साठी तर ब ची जागा सर्वसाधारण आहे. अशी माहिती उपजिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी हेमंत निकम यांनी बोलताना दिली.
आरक्षण सोडत पार पाडण्यासाठी उपजिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी हेमंत निकम, मोहोळ नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ. योगेश डोके, नगरपरिषद प्रशासनातील योगेश डोके, सुवर्णा हाके, महेश माने, प्रियांका चव्हाण, दिनेश गायकवाड, अजित दानोळे त्याचबरोबर मोहोळ नगरपरिषद प्रशासनातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी वर्गाने परिश्रम घेतले.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages