प्रज्ञाशोध परीक्षेत काव्या देशमुख राज्यात तिसरी...तसेच टॅलेंट शोध परीक्षेत राज्यात सातवी.... - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, June 14, 2022

प्रज्ञाशोध परीक्षेत काव्या देशमुख राज्यात तिसरी...तसेच टॅलेंट शोध परीक्षेत राज्यात सातवी....

 प्रज्ञाशोध परीक्षेत काव्या देशमुख राज्यात तिसरी...तसेच टॅलेंट शोध परीक्षेत राज्यात सातवी....

बेंबळे (कटूसत्य वृत्त):- राज्यस्तरीय मंथन प्रज्ञाशोध परीक्षेत तांबवे टें ता.माढा येथील काव्या निलेश देशमुख हिने १५० पैकी १४६ गुण मिळवून राज्यात तिसरा क्रमांक मिळविला आहे, तसेच  राज्यस्तरीय एटीएस प्रज्ञाशोध परिक्षेत २०० पैकी १९२ गुण मिळवून राज्यात तिसरा क्रमांक पटकावला आहे, तसेच महाराष्ट्र टॅलेंट सर्च परिक्षेत कु. काव्या हीने  राज्यात सातवा क्रमांक मिळविला. काव्या ही आदर्श पब्लिक स्कूल,कुर्डूवाडीची विद्यार्थीनी असून तीला वर्गशिक्षक सुरेखा कांबळे,आई सोनाली देशमुख, वडील निलेश देशमुख, मंगेश लचके यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल तिचे गटशिक्षणाधिकारी बंडू शिंदे,केंद्रप्रमुख सिमिंता कुंभार, आदर्श पब्लिक स्कूलचे संस्थापक-अध्यक्ष अमोल सुरवसे,संचालिका पुजा सुरवसे,यशराज फाऊंडेशनचे अध्यक्ष गोरख खटके-पाटील,मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष तात्यासाहेब पाटिल, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सचिन जगताप, तडवळे विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन विश्वनाथ परबत, विकास खटके-पाटील यांनी अभिनंदन केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages