अध्यात्मिक शिक्षणामुळे बौद्धिक व मानसिक विकास होतो :- रवि वसंत सोनार वारकरी शिक्षण संस्थेत पोशाख भेट - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, June 11, 2022

अध्यात्मिक शिक्षणामुळे बौद्धिक व मानसिक विकास होतो :- रवि वसंत सोनार वारकरी शिक्षण संस्थेत पोशाख भेट

अध्यात्मिक शिक्षणामुळे बौद्धिक व मानसिक विकास होतो : रवि वसंत सोनार वारकरी शिक्षण संस्थेत पोशाख भेट

                पंढरपूर (कटुसत्य वृत्त):- “अध्यात्मिक शिक्षणामुळे अभ्यासकाचा बौद्धिक व मानसिक विकास होतो.” असे मत येथील सामाजिक कार्यकर्ते व विश्वविक्रमवीर कवी रवि वसंत सोनार यांनी व्यक्त केले. ते त्यांच्या जन्मवर्षाच्या सुवर्णमहोत्सवाच्या औचित्याने संकल्पित कला, क्रीडा, साहित्य, संगीत, आरोग्य, शिक्षण, सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांच्या संकल्पांतर्गत त्यांचे चिरंजीव ओंकार सोनारच्या वाढदिवसानिमित्त पोषाख भेट उपक्रमावेळी बोलत होते. पुढे बोलताना कवी रवि सोनार म्हणाले की :- “जास्तीत जास्त व्यक्तिंनी होतकरु आणि गरजू विद्यार्थ्यांना मदतीचा हात देण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे.”

                श्री व सौ सविता रवि सोनार यांचे सुपुत्र चि. ओंकार सोनार याच्या वाढदिवसाच्या औचित्याने सोनार दांपत्यांकडून येथील श्री विठ्ठल रुक्मिणी अध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांना पोषाखांचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी ओंकार सोनार, ह. भ. प. रामेश्वर महाराज जाधव व शिक्षण संस्थेचे विद्यार्थी उपस्थित होते. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी कवी रवि सोनार स्नेह परिवाराच्या वतीने विशेष परिश्रम घेण्यात आले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages