कौतुकास्पद: लोटेवाडी ग्रामपंचायतीला यश :विधवा महिलेस दिले सुवासिनी चे आमंत्रण



सांगोला (जगन्नाथ साठे):- राज्य शासनाने विधवा महिलांना समाजामध्ये असणारी दुय्यम वागणूक मोडून काढण्यासाठी नविन कायदाच अमलात आणला त्याचाच परिणाम म्हणून सांगोला तालुक्यातील लोटेवाडी ग्रामपंचायतीने दिनांक 31मे2022 सरपंच विजय खांडेकर यांनी ग्रामसभेमध्ये एक ठराव घेतला होता.
त्यामध्ये विधवा किंवा पुनर्विवाह केलेल्या महिलांना समाजामध्ये दुय्यम वागणूक दिली जाते. त्यासाठी लोटेवाडी मध्ये समाज प्रबोधन करण्याचे काम हाती घेतले आहे. त्याचाच एक भाग दिनांक 14 जून 2022 रोजी गावातील रामचंद्र सरगर सर यांनी मायाक्का देवीच्या सवासणी व दुधाचा कार्यक्रम आयोजित केला होता.सदर कार्यक्रमा मध्ये ज्या विधवा स्त्रिया व दुसरे लग्न केलेल्या महिलांना कोणत्याही कार्यक्रमांमध्ये सवासणी म्हणून मान दिला जात नाही,त्या स्त्रियांना मान सन्मान देवून त्यांना सवासणी या कार्यक्रमामध्ये त्यांना सुवासणी ठेवून इतर स्त्रिया प्रमाणे मानसन्मान देण्याचे निमंत्रण दिले.त्यासाठी लोटेवाडी गावातील विधवा स्त्रियांनी सवासणी म्हणून येण्यास तयारी दाखवलेली आहे.तरी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रुक्मिणी रामचंद्र सरगर स्वामिनी महिला बचत गटाच्या अध्यक्षा यांनी मोलाची जबाबदारी स्वीकारली.
No comments:
Post a Comment