राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त समता रॅली
.jpg)
.jpg)
स्वातंत्र्य, समता, बंधुता, एकात्मता संविधानाचा गाभा साईओ दिलीप स्वामी यांचे प्रतिपादन
सोलापूर, (कटूसत्य वृत्त):-सामाजिक समता प्रस्थापित करण्यासाठी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी मोठे योगदान दिले. स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि एकात्मता हे भारतीय संविधानाचा गाभा असून त्याचे प्रत्येक नागरिकाने आत्मसात करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी केले.
%20(1).jpg)
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त समाज कल्याण कार्यालयातर्फे आयोजित समता रॅलीवेळी स्वामी बोलत होते. सकाळी ८.३० वाजता पार्क चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास श्री स्वामी, समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त कैलास आढे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले. समता रॅलीला स्वामी आणि आढे यांनी हिरवा झेंडा दाखवून प्रस्थान करण्यात आले.
.jpg)
राजर्षी शाहू महाराजांनी समाजात समता व सामाजिक न्यायचे मूळ रुजवले त्यांच्या विचारांच्या प्रेरणेतूनच राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत सामाजिक व आर्थिक दुर्बल घटकांसाठी विविध योजना प्रभावीपणे राबवून आर्थिक व सामाजिक उन्नतीचे कार्य केले जाते. छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांना वंदन करुन जिल्ह्यातील सर्व जनतेस सामाजिक न्याय दिनानिमित्त लोक कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी करणे ही विभागाची बांधिलकी असून विभाग यासाठी नेहमीच अग्रेसर असल्याचे आढे यांनी रॅलीच्या समारोपप्रसंगी सांगितले.
राजर्षी शाहू महाराज जयंती व सामाजिक न्याय दिनाचे औचित्य साधुन जिल्ह्यात समता रॅलीच्या माध्यमातून समतेचे विचार व लोक जागृती करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य अभिवादन कार्यक्रमाव्दारे होत असल्याची माहिती आढे यांनी दिली.सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून जिल्ह्यातील कानाकोपऱ्यातील वंचित उपेक्षित घटकांपर्यंत विभागाच्या योजनांचा लाभ पोहोचावा, यादृष्टीने अनेक शासनाच्या सकारात्मक निर्णयाची अंमलबजावणी जिल्ह्यामध्ये करण्यात येत आहे. यामध्ये वाड्या वस्त्यांची जातीवाचक नावे बदलणे, हा विभाग छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांचे पाईक होवून समता निर्माण करण्यासाठी कार्य करीत आहे. विभागाची प्रत्येक योजना संबंधित गरजूपर्यंत पोहोचावी, यासाठी कार्यालय प्रयत्नशील असते. सामाजिक न्याय विभागाची प्रतिष्ठा वाढविण्याचे काम करीत असल्याचेही आढे यांनी सांगितले.
रॅलीमध्ये कार्यालयातील सर्व अधिकारी, कर्मचारी, शासकीय वसतिगृहाचे कर्मचारी, विविध शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी व समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक, आश्रमशाळेचे प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक, विविध महामंडळाचे कर्मचारी, प्रकल्प अधिकारी, समतादूत व तालुका समन्वयक सामील झाले होते.
0 Comments