नजिक पिंपरी तालुका मोहोळ येथील शासकीय निवासी शाळेत विनामूल्य प्रवेश सुरु - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, June 1, 2022

नजिक पिंपरी तालुका मोहोळ येथील शासकीय निवासी शाळेत विनामूल्य प्रवेश सुरु

नजिक पिंपरी तालुका मोहोळ येथील शासकीय निवासी शाळेत विनामूल्य प्रवेश सुरु

            सोलापूर (कटूसत्य वृत्त):-राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत मोहोळ कुरुल रोड वरील नजिक पिंपरी ता. मोहोळ येथे अनुसूचित जाती व नवबौध्द मुलांची शासकीय निवासी शाळा आहे. या शाळेत सन २०२२-२०२३ या शैक्षणिक वर्षासाठी सहावी ते दहावी या सेमी इंग्रजी माध्यमाच्या वर्गासाठी प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे.

            अनुसूचित जाती प्रवर्गातील ८० टक्के जागा, अनुसूचित जमाती १० टक्के, विमुक्त जाती व भटक्या जमाती ५ टक्के, विशेष मागास प्रवर्ग ३ टक्के, तर अपंग प्रवर्गाकरिता २ टक्के जागा राखीव आहेत. रिक्त संख्येनुसार प्रवेश देण्यात येणार आहे.

            या शाळेत मोफत प्रवेश, भोजन, निवास, डिजिटल क्लासची वाय-फाय सह उच्च प्रतीची सोय, गणवेश, शालेय साहित्य, क्रीडा साहित्य, अनुभवी शिक्षक वृंद इत्यादी शासकीय नियमानुसार मिळणाऱ्या सोयी सुविधा उपलब्ध आहेत. अधिक माहिती करिता ९०११३५०९०८ या क्रमांकावर संपर्क करावा, असे मुख्याध्यापकांनी कळविले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages