बेंबळे ग्रा.पं.च्या उपसरपंचपदी नमीता अनपट.... - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, June 14, 2022

बेंबळे ग्रा.पं.च्या उपसरपंचपदी नमीता अनपट....

 बेंबळे ग्रा.पं.च्या उपसरपंचपदी नमीता अनपट....

बेंबळे(कटूसत्य वृत्त):- बेंबळे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी शिवशंभो ग्राम विकास आघाडीच्या नमिता गोरख आनपट यांची एकमताने निवड करण्यात आली, नानासाहेब भोसले यांनी आपल्या उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्यामुळे त्यांच्या रिक्त झालेल्या जागेवर नमिता अनपट यांची ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या बैठकीत एकमताने निवड करण्यात आली ,निवड प्रक्रिया अधिकारी म्हणून ग्राम विकास अधिकारी मधुकर माने यांनी काम पाहिले. या निवडीचे वेळी सरपंच विजय पवार  माजी सरपंच कैलास भोसले पोपट अनपट, रत्नाकर कुलकर्णी , ग्रामपंचायत सदस्य विकास अनपट, नाना भोसले, राजश्री भोसले ,संजीवनी भोसले, शैला किर्ते ,छाया लोंढे तसेच दीपक भोसले, समाधान भोसले, राहुल कुलकर्णी, शहाजी भोसले ,राजेंद्र जगताप, अशोक देवकर ,दादा भोसले, दत्ता भगत ,हनुमंत अनपट, बाळासाहेब कावळे, मच्छिंद्र अनपट, दीपक किर्ते, विकास किर्ते यांचेसह आघाडीचे कार्यकर्ते व शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते .नमिता अनपट यांची उपसरपंच पदी निवड होताच अनुराधा शिंदे यांनी त्यांचा तसेच इतर महिला ग्रामपंचायत सदस्यांचा फेटा बांधून, शाल, श्रीफळ व पुष्पहार घालून सत्कार केला तसेच कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून, फटाक्याची आतषबाजी करून व मिठाई वाटून आनंद साजरा केला. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages