शांतता सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पत्रकारांनी देखील प्रयत्न करावेत- पोलीस आयुक्त राजेंद्र माने यांचे आवाहन
डिजिटल मीडिया पत्रकार संघाकडून नूतन पोलीस आयुक्त राजेंद्र माने यांचा सत्कार

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर शहरात शांतता सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही नूतन पोलीस आयुक्त राजेंद्र माने यांनी डिजीटल मीडिया पत्रकार संघाच्या सत्काराला उत्तर देताना दिली.
सोलापूर डिजिटल मीडिया पत्रकार असोसिएशनच्यावतीने नूतन पोलीस आयुक्त राजेंद्र माने यांचा अध्यक्ष विजयकुमार बाबर यांच्या प्रमुख उपस्थिती सत्कार करण्यात आला.यावेळी ते बोलत होते.पुढे बोलताना ते म्हणाले ,पत्रकार हा समाजाचा तिसरा डोळा असून योग्य त्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचवण्याचा पत्रकाराने प्रयत्न करावा.सोलापूर शहराची शांतता सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी , समाजाला योग्य दिशा देण्यासाठी पत्रकारांनी प्रयत्न करावे असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.
यावेळी पत्रकार संघाचे मुकुंद उकरंडे , आप्पा बनसोडे , शहानवाज शेख , सचिन जाधव , अभिषेक आदेप्पा , तोसिफ शेख , वैभव गंगणे ,रवी ढोबळे , फयाज शेख , नागेश खराडे , विक्रम इंगळे , रत्नदीप सोनवणे , योगेश कल्याणकर , रवी काकडे , इब्राहिम मुजावर , शिवानंद येरटे , सागर इप्पल्पल्ली , नबी शेख , अकिब मडकी आदींची उपस्थिती होती.

No comments:
Post a Comment