पंढरपुरात महाराणा प्रतापसिंह यांची जयंती उत्साहात साजरी

पंढरपूर (कटुसत्य वृत्त): शुरवीर विश्ववंदनीय शार्दुल महाराणा प्रतापसिंह यांची जयंती पंढरपूर राजपूत समाज यांच्यावतीने उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी पुतळ्याचे पूजन मान्यवरांच्याहस्ते करण्यात आले.
यावेळी कोळी महासंघाचे अध्यक्ष अरूणभाऊ कोळी, भाजपाचे माजी शहराध्यक्ष दत्तासिंह राजपूत, कॉंग्रेस सेवा दलाचे अध्यक्ष गणेश माने, पैलवान प्रसाद कोळी, राजपूत घिसाडी समाजाचे ईश्वर साळुंखे, योगेश साळुंखे, पत्रकार लखन साळुंखे, करण पवार, प्रताप पवार, सुरज पवार, वैभव पवार, संतोष पवार यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
यावेळी भाजप माजी शहराध्यक्ष दत्तासिंह राजपूत म्हणाले की, महाराणा प्रतापसिंह यांचे शौर्य, पराक्रम आणि मातृभूमीसाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढणाऱ्या त्यांच्या प्रखर कार्यामुळे आम्ही स्वराज्य स्थापनेच्या लाटेवर आरूढ झालो असे गौरवोद्गार छत्रपती शिवाजी महाराज यांनी काढले याची इतिहासात नोंद आहे. त्यामुळे त्यांच्या कार्याची महती काय हे सहजपणे लक्षात येते. मोगलांशी मरेपर्यंत लढले व मोगलांना सळो की पळो करून लढले त्यांच्या कार्याचा अभिमान असून त्यांच्या कार्याची इतरांनी प्रेरणा घ्यावे अशी असे आवाहन केले.
No comments:
Post a Comment