३४० लिटर हातभट्टी दारू जप्त करून १ लाख २२ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, June 3, 2022

३४० लिटर हातभट्टी दारू जप्त करून १ लाख २२ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

३४० लिटर हातभट्टी दारू जप्त करून १ लाख २२ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

                  सोलापूर (कटूसत्य वृत्त):- राज्य उत्पादन शुल्क विभागाने हातभट्टीची अवैध वाहतूक करणाऱ्या दोन मोटारसायकलींसह ३४० लिटर हातभट्टी दारू जप्त करून १ लाख २२ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई दोन जून रोजी पहाटे केली.सोलापूर शहरातील टेकडे नगर व दोन नंबर एसटी स्टँड या परिसरात मोटारसायकलवरून अवैध हातभट्टी दारूची वाहतूक होणार आहे,अशी माहिती गुप्त बातमीदार मार्फत मिळाली. त्यानुसार निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क अ विभाग कार्यालयाच्या अधिकारी व कर्मचारी यांनी सापळा लावून वाहने अडवून तपासली.  कारवाईत आरोपी विजय थावरु पवार (रा. बक्षी हिप्परगा, ता. दक्षिण सोलापूर) यास अटक करण्यात आली.तीत एक मोटारसायकल (क्र. एमएच१३ डीएन ७०२७) व एक विनाक्रमांकाची अशा दोन्ही मोटारसायकलींवर पाच रबरी ट्युबमध्ये अंदाजे ३४० लिटर अ वैध हातभट्टी दारू मिळून आली. एक आरोपी फ़रार आहे.ही कामगिरी महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त कांतिलाल उमाप, विभागीय उपआयुक्त पुणे विभाग प्रसाद सुर्वे , अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क सोलापूर नितीन धार्मिक, उपअधीक्षक आदित्य पवार यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक एस.एस. फडतरे, दुय्यम निरीक्षक पी. बी. देशमुख, यू. व्ही. मिसाळ, सहाय्यक दुय्यम निरीक्षक एस. ए. बिराजदार, जवान सी. एस. व्हनगुंडे, आर. डी. जगताप, जी. के. ढब्बे, चालक आर. बी. मदने यांच्या पथकाने पार पाडली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages