Hot Posts

6/recent/ticker-posts

पाषाण परिसरात मद्यपी रिक्षाचालकाची पोलिसांना मारहाण, उपनिरीक्षकही जखमी

 पाषाण परिसरात मद्यपी रिक्षाचालकाची पोलिसांना मारहाण, उपनिरीक्षकही जखमी

पुणे (कटूसत्य वृत्त):- भर रस्त्यात दारुच्या नशेत कारवर दगड मारुन तिचे नुकसान केल्याने पोलीस समजावून सांगत असताना त्यांना मारहाण करण्याचा प्रकार पाषाण येथे बुधवारी मध्यरात्री घडला.या रिक्षाचालकाला पकडून पोलीस व्हॅनमधून  नेत असताना त्याने दरवाजा जोरात आपटल्याने त्यात पोलीस उपनिरीक्षकाचे बोटाला दुखापत झाली.अनिल प्रकाश सदाशिव  (वय ३२, रा. निम्हण आळी, विठ्ठल मंदिराजवळ, पाषाण, मुळ रा. अकोला) असे या रिक्षाचालकाचे नाव आहे.

याप्रकरणी पोलीस नाईक दत्तात्रय बाळशिराम गेंगजे यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात  फिर्याद (गु. रजि. नं. २७४/२२) दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्याचे सहकारी पोलीस शिपाई जारवाल हे बुधवारी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास पाषाण सुस रोडवर  पेट्रोलिंग करीत होते. पाषाण येथील हॉटेल रोनिता  जवळ अनिल सदाशिव हा दारु पिऊन रिक्षा चालवत होता. त्याने बाजूला उभ्या असलेल्या एका होंडा कारच्या मागील भागाचे डिक्कीवर दगड मारुन नुकसान करीत होता.कारमधील दोघांनी मदतीसाठी आरडा ओरडा केला. ते ऐकून पोलीस मदतीसाठी पोहचले.

त्यांनी अनिल सदाशिव याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्याने शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.फिर्यादीसोबत झटापट करुन शर्टचे बटण तोडले. त्याला ताब्यात घेऊन पोलीस व्हॅनमध्य बसवत असताना त्याने कारचा दरवाजा जाणीवपूर्वक जोरात आपटला.त्यात पोलीस उपनिरीक्षक बसवराज माळी यांचे उजव्या हाताचे मधले बोटाला दुखापत झाली.सार्वजनिक ठिकाणी आरडाओरडा करुन शिवीगाळ करुन तुम्हाला बघून घेतो, अशी धमकी देऊन शांततेचा भंग केला,म्हणून गुन्हा दाखल करण्यात आले आहे. सहायक पोलीस निरीक्षक कोळी तपास करीत आहेत.

Reactions

Post a Comment

0 Comments