Hot Posts

6/recent/ticker-posts

महाविकास आघाडीमधून बाहेर पडायला तयार - संजय राऊत यांचे विधान

 महाविकास आघाडीमधून बाहेर पडायला तयार - संजय राऊत यांचे विधान

मुंबई (नासिकेत पानसरे):- राज्यातील महाविकास आघाडीतून शिवसेना बाहेर पडायला तयार आहे. तुम्ही बाळासाहेबांची शिवसेना म्हणता ना, मग या समोर बसून बोला आपली भूमिका मांडा.मात्र पत्र माध्यमातून पाठवून किंवा इतर समाज माध्यमातून नव्हे तर समोरसमोर बोला २४ तासात या मुंबईत दाखल व्हा.असे आवाहन शिवसेना प्रवक्ता खासदार संजय राऊत यांनी बंडखोरांना दिले.

गोहाटीतून एकनाथ शिंदे कंपुच्या तावडीतून सुटल्यावर आमदार अकोल्याचे नितिन देशमुख आणि कैलास पाटील यांनी मांडली. वर्षा या शासकीय निवासस्थानी शिवसेना आमदारांच्या बैठकानंतर नितिन देशमुख आणि यांनी पत्रकार परीषद झाली त्यावेळी राऊत बोलत होते.    

....तर महाविकास आघाडीतून शिवसेनेने बाहेर पडावे ही त्यांची भूमिका आहे.तर त्यांनी आपली भूमिका शिवसेना पक्षप्रमुखासमोर आपले म्हणणे मांडावे. शिवसेना महाविकास आघाडीतून बाहेर पडायला तयार आहे. तुम्ही २४ तासांत मुंबईत दाखल व्हा, असे संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे आणि बंडखोरांना आवाहन केले आहे.

मुंबईत नितीन देशमुख यांची पत्रकार परिषद झाली. यावेळी शिवसेना नेते संजय राऊत, निलम गोऱ्हे यांच्यासह अनेक नेत्यांची उपस्थिती होती. यावेळी त्यांनी आपल्यासोबत झालेला घटनाक्रम सांगितला. त्यांनी सांगितले की, एकनाथ शिंदे यांनी त्यांना कशा प्रकारे बैठकीला बोलवले आणि ते कशाप्रकारे गुजरातच्या दिशेने गेले. त्यांना वाटेत प्रकारे शंभूराजे देसाई आणि संदिपान भुमरे हे भेटले. याबाबतची माहिती दिली. 

यावेळी पत्रकार परिषदेला उपस्थित असलेल्या संजय राऊत यांनी यावेळी मोठे विधान केले. ते म्हणाले की, एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या सर्व आमदारांना घेऊन २४ तासांत दाखल व्हावे. त्यांनी शिवसेना पक्षप्रमुखां समोर आपली बाजू मांडावी. त्यावर विचार केला जाईल. जर ते आले तर तर आम्ही महाविकास आघाडीतून बाहेर पडण्यासाठी शिवसेना तयार आहे.

गुवाहाटी येथील रॅडिसन ब्लू हॉटेलमधल्या ४२ बंडखोर आमदारांचा फोटो आला समोर आला आहे. यात महाराष्ट्रातील ४२ बंडखोर आमदार दिसत आहेत.यात ३५ आमदार शिवसेनेचे आणि ७ अपक्ष आमदार दिसत आहेत. 

Reactions

Post a Comment

0 Comments