यशोदिपचे' गोरख खटके-पाटील , 'ड्रीमराष्ट्र उभारणी' प्रेरणा पुरस्काराने सन्मानित....... - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, June 13, 2022

यशोदिपचे' गोरख खटके-पाटील , 'ड्रीमराष्ट्र उभारणी' प्रेरणा पुरस्काराने सन्मानित.......

 यशोदिपचे' गोरख खटके-पाटील , 'ड्रीमराष्ट्र उभारणी' प्रेरणा पुरस्काराने सन्मानित.......


 बेंबळे(कटूसत्य वृत्त):- सामाजिक,शैक्षणिक ,संगणक प्रशिक्षण, ग्रामीण युवा जागृती क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल टेंभुर्णी ता.माढा येथील यशोदिप कॉम्प्युटर एज्युकेशन, यशोदिप डेव्हलपर्स, यशराज फाऊंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष गोरख महादेव खटके-पाटील यांना ड्रीम फाउंडेशन व चाणक्य गुरुकुल अकॅडमी, पुणे यांच्यातर्फे भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव उपक्रमाअंतर्गत ड्रीम राष्ट्र उभारणी प्रेरणा पुरस्काराने अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते सोलापूर येथे गौरविण्यात व सन्मानित करण्यात आले. यावेळी उद्योगपती कुमार करजगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  होते, प्रमुख पाहुणे म्हणून मनोरमा हॉस्पिटलचे डॉ.सुमित मोरे, सचिन चौधरी,शरद नाईक, फाऊंडेशनचे काशिनाथ भतगुणकी, सतिश पाटील, सचिन चव्हाण उपस्थित होते. 
                     गोरख खटके-पाटील यांचे अनाथ, वयोवृध्द, गरीब यांना आर्थिक मदत, माढा तालुक्यातील दहावी, बारावी व युपीएससी, एमपीएससी परिक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा १५ वर्षांपासून दरवर्षी सन्मान,गोरगरीब, गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत,कोविड-१९ मुळे अनाथ झालेल्या कै. तानाजी नागटिळक यांच्या  दोन्ही मुलांना शिक्षणासाठी २२ हजारांची मदत, यशोदिप कॉम्प्युटरच्या माध्यमातून तालुक्यातील अनेक गरीब, गरजू विद्यार्थ्यांना मोफत संगणक साक्षर करण्याचे काम,तालुक्यातील विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यासाठी यशस्वी क्लास- वन अधिकाऱ्यांच्या व्याख्यानांचे आयोजन, विविध संस्थाच्या सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक उपक्रमांना यशोदिप फाऊंडेशनकडून सढळ हाताने आर्थिक मदत, तांबवे टें ता.माढा येथील जिल्हा परिषद शाळांना संगणकासाठी व भौतिक सुविधांसाठी आर्थिक मदत असे सामाजिक कार्य मागील १८ वर्षापासून अविरत सुरू आहे.या पुरस्काराने सन्मानित करून गौरविण्यात आल्याबद्दल खटके पाटील यांचे सर्व थरातील मान्यवरांकडून अभिनंदन होत आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages